पुण्यात धक्कादायक घटना, भर रस्त्यातून तरुण तरुणीला पळवलं आणि...

पुण्यात धक्कादायक घटना, भर रस्त्यातून तरुण तरुणीला पळवलं आणि...

आरोपींनी तरुणाला मारहाण करुन गाडीतून खाली ढकलले आणि तरुणीला घेऊन ते साताऱ्याच्या दिशेने निघाले होते.

  • Share this:

पुणे, 30 ऑगस्ट : पुण्यात भर रस्त्यातून तोतया पोलिसांनी तरुण-तरुणीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. सेनापती बापट रोडवरील स्टार बाजार मार्केट परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. मात्र नंतर पोलिसांनी सतर्कता दाखवत तातडीने आरोपींचा पाठलाग करत अपहरण करण्यात आलेल्या तरुण-तरुणीची सुटका केली आहे

आरोपींनी आपण पोलीस असल्याचं खोटं सांगत सेनापती बापट रोड उभा असलेल्या तरुण-तरुणीला गाडीत बसायला सांगितलं. गाडीत बसायला त्यांनी नकार दिल्यानंतर धक्काबुक्की करत तुम्हाला पोलीस स्टेशनला न्यायचं आहे, असा दम भरत गाडीत बसवलं. त्यानंतर आरोपी तरुण-तरुणीला घेऊन साताऱ्याचे दिशेने निघाले होते.

पीडित तरुण-तरुणीला घेऊन चांदणी चौक ते बेंगलोर हायवेने कात्रज घाटाजवळ आरोपी पोहोचले. तिथे त्यांनी तरुणाला मारहाण करुन गाडीतून खाली ढकलले आणि तरुणीला घेऊन गाडी साताऱ्याच्या दिशेने गेले. त्यानंतर तरुणाने तात्काळ पोलिसांना संपर्क साधला आणि तिथूनच तपासाची चक्र फिरली.

पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाले आणि त्यांच्या टीमने तत्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर रविवारी पहाटे साडे तीन वाजता आरोपीना सातारा टोल नाका येथे ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत 'सकाळ'ने वृत्त दिलं आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सागर अनिल कोळेकर (वय 23, रा.सुरुर, सातारा), मंगेश राजाराम खंडजोडे (वय 18),शुभम नवनाथ बरकडे ( वय 20), मंगेश रमेश शिंदे, वय 21), राहुल बाळासाहेब बरकडे (वय 27, चोघेही रा. लिंब, सातारा), किरण दिलीप बाबर, वय 23, रा.सातारा), दत्तात्रय रामचंद्र भोईटे (वय 34, रा.वाघोली,सातारा), संदीप किसन जाधव (वय 28, रा.आर्डे, सातारा) अक्षय कृष्णा दिक्षीत (वय 26,रा.आर्डे,सातारा) या संशयित आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, याप्रकरणातील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण तपास करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: August 30, 2020, 7:20 PM IST

ताज्या बातम्या