मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

20 वर्षीय तरुणीचे हातपाय बांधून बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

20 वर्षीय तरुणीचे हातपाय बांधून बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

आरोपींनी पीडित महिला घरात एकटी असताना घरात घुसून पीडितेला मारहाण केली. त्यानंतर तिचे हातपाय तोंड बांधून...

आरोपींनी पीडित महिला घरात एकटी असताना घरात घुसून पीडितेला मारहाण केली. त्यानंतर तिचे हातपाय तोंड बांधून...

आरोपींनी पीडित महिला घरात एकटी असताना घरात घुसून पीडितेला मारहाण केली. त्यानंतर तिचे हातपाय तोंड बांधून...

पुणे, 03 ऑगस्ट : पुणे (pune) जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील (junner) आळेफाटा पोलीस ठाण्याच्या (aalefata police) हद्दीत एका 20 वर्षीय तरुणीचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार (rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी ॲट्रॉसिटी तसंच अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून नराधम आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक बनोटे व संदीप सूर्यवंशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. आरोपींनी पीडित महिला घरात एकटी असताना घरात घुसून पीडितेला मारहाण केली. त्यानंतर तिचे हातपाय तोंड बांधून तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सौरव गांगुली झाला KBC चा एँकर, हॉट सीटवर बसल्यानंतर बिग बी म्हणाले... VIDEO

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडितेच्या जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. आणि काही तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली. या नराधमांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आंबेगाव तालुक्यात 6 गावात 18 ठिकाणी घरफोडी

दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत 6 गावांत तब्बल 18 ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व चोरीचा थरार घडला असून यात जवळपास 4 लाख रुपये किंमतीचे दागिने तसंच रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला असून चोरट्यांनी बंद घरांमध्येच या सर्व चोरी केल्या आहेत.

मोलकरणीने रचला मालकाची तिजोरी फोडण्याचा कट, पतीसह 6 जणांनी दरोडाही टाकला पण...

चोरट्यांनी घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पहाटे दोन पासून ते पहाटे चार वाजेपर्यंत गोहे बुद्रुक, डिंबे, कानसे, शिनोली, पिंपळगाव तर्फे घोडा,धोंडबार शिंदेवाडी या 6 गावांतील 18 ठिकाणी जी बंद घरे आहेत. घरमालक बाहेर गावी गेले आहेत, अशाच ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल तसंच घरगुती वस्तूंची चोरी केली आहे. चोरट्यांच्या वाढत्या दहशतीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान आता पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे.

First published:

Tags: Pune