Elec-widget

पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टरचा कहर, बातमी वाचून रुग्णालयात जाणारही नाही!

पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टरचा कहर, बातमी वाचून रुग्णालयात जाणारही नाही!

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हा प्रकार घडल्याचा आरोप संबधित तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड, 13 जुलै : लोक डॉक्टरांवर डोळे बंद करून विश्वास ठेवतात. पण त्यांनीच जर चुकीचे उपचार केले तर? डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा गंभीर प्रकार पिंपरीमध्ये समोर आला आहे. तरुणाच्या दोन्ही किडन्या व्यवस्थित असतानादेखील डॉक्टरांनी त्यावर डायलिसिसची प्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हा प्रकार घडल्याचा आरोप संबधित तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

पिंपरी शहरातील वेताळनगरमध्ये राहणारा आनंद अनिवाल हा तरुण सांधेदुखी आणि तापामुळे हैराण होता. त्याला उपचारासाठी YCM रुग्णालयात दाखल केल्या गेलं. त्यानंतर आनंदच्या रक्ताच्या तपासण्या केल्या गेल्या. ज्यामध्ये त्याच्या रक्तातील क्रिटेनिनच प्रमाण 24 असल्याचा रिपोर्ट आला. सामान्य माणसाच्या शरीरात हे प्रमाण फक्त 0.66 ते 1.25 एव्हढंच असतं. मात्र, आनंदच्या रिपोर्टमध्ये हे प्रमाण 24 पट अधिक दाखवल्या गेल्याने डॉक्टरना धक्का बसला.

या रिपोर्टनुसार रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं समजून डॉक्टरांनी आनंदवर डायलिसिस करण्याचा निर्णय घेऊन ती प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आनंदाचा रक्त तपासणीचा दुसरा रिपोर्ट आला. ज्यामध्ये त्याच्या किडन्या आणि क्रिटनिनचं प्रमाण नॉर्मल दाखवलं गेलं. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आनंदच्या नातेवाईकांना मोठा धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी परत रक्त तपासणी करण्याचं ठरवलं.

Loading...

हेही वाचा : हॉटेलच्या समोरच सुरू होता वेश्या व्यवसाय, 5 महिलांसह 11 जण रंगेहात पकडलं!

आनंदच्या रक्ताचे नमुने खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. तेव्हा तिथूनही आनंदाचा रिपोर्ट नॉर्मल आला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. आता याबाबद YCM रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांना विचारलं असता त्यांनी प्रकणाची सखोल चोकशी करून माध्यमांसमोर खुलासा करणार असल्याचं सांगितलं आहे.

पण, रुग्णालयाच्या आणि संबंधित डॉक्टरांच्या अशा हलगर्जीपणामुळे या एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. देवरूपी मानल्या जाणाऱ्या डॉक्टरांनी असं केलं तर कसं होणार अशी प्रतिक्रिया आनंदच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

SPECIAL REPORT : शिर्डीत द्वारकामाईत साईंची प्रतिमा दिसली?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 09:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...