Home /News /pune /

धक्कादायक, पुण्यातील 'या' तालुक्यात देशातील सर्वात जास्त कोरोना मृत्यू दराचा टक्का!

धक्कादायक, पुण्यातील 'या' तालुक्यात देशातील सर्वात जास्त कोरोना मृत्यू दराचा टक्का!

ग्रीन पट्टा अशी ओळख असलेल्या किल्ले शिवनेरीचा परिसराला सुरुवातीपासूनच कोरोनाचं ग्रहण लागले होते.

जुन्नर,16 सप्टेंबर : देशामध्ये सर्वाधिक मृत्यूचा दर असलेला तालुका अशी जुन्नरची नवी ओळख तयार झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतची माहिती News18 लोकमतला दिली. सर्वाधिक मृत्युदर कशामुळे वाढला आहे, याची माहिती आता समोर आली आहे. ग्रीन पट्टा अशी ओळख असलेल्या किल्ले शिवनेरीचा परिसराला सुरुवातीपासूनच कोरोनाचं ग्रहण लागले होते. त्यामुळे जुन्नरमध्ये महसूल आणि आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी मोठी काळजी घेतली गेली. ओझर लेण्याद्री या ठिकाणी दोन मोठी कोविड सेंटरही उभारण्यात आली. मात्र, रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढतच आहे. तालुक्यात ज्या गावांमध्ये रुग्ण वाढत होते तिथे अनेकदा लॉकडाऊनही केलं पण हा आकडा वाढता वाढता वाढतच आहे. यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने समुपदेशनही केलं जातं आहे. पुणे जिल्ह्यातील कोविड सेंटरला दाखल झालेल्या रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्यावरही भर दिला जात आहे. यासाठी एक खास पुस्तिका तयार करण्यात आली आहे आणि कोविड सेंटरला अशी पुस्तके मोफत वाटप करण्यात येत आहेत, अशी माहिती डॉ नंदू सातपुते यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील 13  तालुक्यातील मृत्य दर   पुणे जिल्ह्याचा एकूण मृत्यू दर आहे..2.7 1) जुन्नर 5.3 टक्के 2) पुरंदर 4.9 टक्के 3) इंदापूर-4.0 टक्के 5) शिरूर 3.7 टक्के   6) भोर 3.5 टक्के 7) मावळ 3.4 टक्के 8) वेल्हा 3.3 टक्के 9) आंबेगाव 3.2 टक्के 10) दौंड 3.0 टक्के 11)बारामती 2.7 टक्के 12) खेड  2.0 टक्के   13) हवेली 1.8 टक्के   आकडेवारी वर लक्ष टाकल्यास एक गोष्ट लक्षात येते की, जिल्ह्याच्या एकूण मृत्यू दराच्या( 2.7%) दुप्पट दर हा जुन्नर तालुक्याचा आहे (5.3%).हा दर देशात सर्वाधिक आहे. सुरूवातीपासूनच गाफील राहिलेल्या जुन्नरमधील प्रशासनासाठी ही आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे. मात्र अद्यापही वेळ गेलेली नाही. यामुळे पुढचे धोके टाळले जावू शकतात आणि तालुक्याचा मृत्युदर कमी होण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे तितकेच गरजेचे आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या