मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे जिल्ह्यात कोरोनाला निमंत्रण देणारा धक्कादायक प्रकार, भाजपच्या बड्या नेत्याच्या उपस्थितीचीही चर्चा

पुणे जिल्ह्यात कोरोनाला निमंत्रण देणारा धक्कादायक प्रकार, भाजपच्या बड्या नेत्याच्या उपस्थितीचीही चर्चा

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपच्या एका बड्याने नेत्याने हजरी लावल्याचीही चर्चा आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपच्या एका बड्याने नेत्याने हजरी लावल्याचीही चर्चा आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपच्या एका बड्याने नेत्याने हजरी लावल्याचीही चर्चा आहे.

पुणे, 5 जुलै : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना फिजिकल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र अशातच पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुपौर्णिमेला एका बाबाने धार्मिक कार्यक्रम घेतला, ज्यामध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भाजपच्या एका बड्याने नेत्याने हजरी लावल्याचीही चर्चा आहे.

वाद्यांचा गजर, मिरवणूक आणि मग सर्वांसमोर महाराज काट्यांवर पाठ टेकून झोपले. यानंतर गुरूदक्षिणेत झोळी भरून पैसे स्वीकारले. शिरुर तालुक्यातील चिंचणी गावात कोरोना काळात अशी गुरूपौर्णिमा झाली आहे. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

कोरोनामुळे शासनाच्या नियमानुसार धार्मिक कार्यक्रमाला बंदी असताना शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त चारशे ते पाचशे लोक एकत्र येत धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये लॉकडाउनच्या नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाला होता.

देशात व राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व ग्रामीण भागातही आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना सगळीकडे सण व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर आषाढी वारी देखील साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. मात्र शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त या महाराजाने चारशे ते पाचशे लोक एकत्र करत धार्मिक कार्यक्रम घेत गावात कोरोनाचे आमंत्रण देण्याचाच धक्कादायक प्रकार केला आहे.

चिंचणी येथे प्राचीन भैरवनाथ मंदिर असून या मंदिरात तात्यासाहेब पवार हे महाराज काट्यांमध्ये झोपणे तसेच काचेच्या बाटल्यांवर चालणे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम गेल्या 40 वर्षापासून गुरु पौर्णिमेला करत असतात. त्यानंतर देवाच्या पालखीची दिंडी काढली जाते. शेवटी देवाची आरती घेतल्यानंतर जेवणाच्या पंगती सुरू असताना महाराज पंगतीमधून फिरत भिक्षा मागतात. यावेळी झोळीत भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दक्षिणा टाकली जाते.

गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी या गावांमध्ये कार्यक्रम घेतले जातात. परंतु यावर्षी कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घेऊ नये असे शासनाचे आदेश असताना गावामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला. याला ग्रामपंचायत किंवा पोलिसांची यासह कोणाचीही परवानगी घेण्यात आली नव्हती. यामध्ये पुणे , पिंपरी चिंचवड, चाकण व अहमदनगर या ठिकाणाहून या कार्यक्रमांमध्ये महिलांसह पुरुष सहभागी झाल्याचे दिसून आले.

नगर जिल्ह्यातील भाजपच्या एका बड्या नेत्याची गा़डी सुद्धा या कार्यक्रमात ठिकाणी दिसल्याने मोठी चर्चा रंगली आहे. एकप्रकारे गावाला धोक्यात टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडला असून जेवणाच्या पंगतीही घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन आता या प्रकारावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published:

Tags: Coronavirus, Pune news, Shirur