मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यांवर आज होणार अंत्यसंस्कार, वाचा अंत्यदर्शनाबाबतची संपूर्ण माहिती

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यांवर आज होणार अंत्यसंस्कार, वाचा अंत्यदर्शनाबाबतची संपूर्ण माहिती

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झालं आहे. (Shivshahir Babasaheb Purandare passed away) ते 100 वर्षांचे होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झालं आहे. (Shivshahir Babasaheb Purandare passed away) ते 100 वर्षांचे होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झालं आहे. (Shivshahir Babasaheb Purandare passed away) ते 100 वर्षांचे होते.

  पुणे, 15 नोव्हेंबर: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झालं आहे. (Shivshahir Babasaheb Purandare passed away) ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव सकाळी 8.30 वाजता त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या सकाळी 10.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

  हेही वाचा- shivshahir babasaheb purandare : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

   बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र आज एका इतिहास पूत्र मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना न्युमोनिया झाला होता, त्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अशी माहिती बाबासाहेब यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली. पण उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलीकडेच पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
  हेही वाचा-  'जाणता राजा' घराघरात पोहोचवणारा तारा निखळला, कसा होता बाबासाहेब पुरंदरेंचा प्रवास?
  बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. पुण्याजवळच्या सासवडमध्ये 29 जुलै 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. तरुणपणापासून ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यानंतर भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेतून कामाला सुरुवात केली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1761’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. 2015 सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
  बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन आणि जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना 2015 साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या 27 वर्षांत 1250 हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. जाणता राजा मध्ये 150 कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी 10 दिवस आणि उतरवण्यासाठी 5 दिवस लागतात.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Pune

  पुढील बातम्या