पुणे, 12 सप्टेंबर : राज्यात शुक्रवारपासून रेडी रेकनरचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. नोंदणी महानिरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मुंबई हे केवळ एकमेव शहर असेल जिथे रेडी रेकनर घटवण्यात आला आहे तर पनवेल महापालिका क्षेत्र हे राज्यात सर्वाधिक वाढ असलेले क्षेत्र आहे. कोणाच्या काळात राज्यात गेल्या पाच महिन्यात नोंदणीशुल्क मध्ये तब्बल 60 टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्याचा विचार करता पुणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक वाढ करण्यात आलेला जिल्हा आहे.
रेडी रेकनरचे दर ठरवताना मुंबईत रेडी रेकनर दरामध्ये 0.6 टक्क्यांनी घट करण्यात आली तर पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल 3.91 टक्के वाढ केली गेली. गेल्या वर्षी झालेल्या दस्तांची नोंदणी मिळालेला महसूल या आकडेवारीवरून ठरलेल्या प्रमाणानुसार ही वाढ अथवा घट करण्यात आल्याचे नोंदणी महानिरीक्षक यांनी सांगितले.
कसे करण्यात आले रेडी रेकनरमध्ये बदल?
राज्यात सरासरी 1.78 टक्के वाढ
राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी 2.81 टक्के वाढ
प्रभावक्षेत्रात 1.89 टक्के
नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रामध्ये 1.29%
मनपा क्षेत्रात1.02% वाढ
शहरानुसार झालेली वाढ
पुणे महापालिका क्षेत्रात 2% वाढ
पीसीएमसी 3.3% वाढ
मुंबईत 0.6% ने घट
ठाण्यात 0.2% ने वाढ
राज्यात सर्वाधिक वाढ पुण्यात
पुणे जिल्ह्यात 3.91% वाढ
नोंदणी शुल्काच्या महसूलात कोरोनाच्या काळात 60 टक्के घट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.