Home /News /pune /

अमित शहा-मुख्यमंत्र्यांची भेट झाली तरीही..., संजय राऊत यांचं मोठं विधान

अमित शहा-मुख्यमंत्र्यांची भेट झाली तरीही..., संजय राऊत यांचं मोठं विधानशिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुण्यातील वडगाव शेरीत भव्य पदाधिकारी मेळावा पार पडला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुण्यातील वडगाव शेरीत भव्य पदाधिकारी मेळावा पार पडला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुण्यातील वडगाव शेरीत भव्य पदाधिकारी मेळावा पार पडला.

पुणे, 26 सप्टेंबर :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray)  यांनी नवी दिल्लीत जाऊन भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री (Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांची स्वतंत्र्य बैठक सुद्धा झाल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे. पण, ही भेट जरी झाली असेल तरी महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्ष टिकणार आहे, याची मी शाश्वती देतो, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुण्यातील वडगाव शेरीत भव्य पदाधिकारी मेळावा पार पडला. राऊत यांच्या या दौऱ्याला भाजपने विरोध केला होता. त्यामुळे शिवसैनिकांना जोरदार शक्तिप्रदर्शन करत राऊतांचे भव्य स्वागत केलं आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्याच मतदारसंघात संजय राऊतांचा मेळावा पार पडला. यावेळी संजय राऊत यांनी चौफेर तोफ डागली. BBMarathi च्या 'या' स्पर्धकाने आतापर्यंत 4 वेळा खाल्ली आहे तुरुंगाची हवा 'आपलं सरकार असलं तरी शेवटी ठोकून काढणं हा आपला मूळ स्वभाव आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  दिल्लीहून परत आले आहे. ते अमित शहांना भेटले असले तरी काळजी नसावी, हे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल याची मी शाश्वती देतो. भाजपने कितीही आदळआपट केली तरी ठाकरे सरकारला धोका नाही, असंही राऊत म्हणाले. 'पुण्यात आता सेनेचे 10 नगरसेवक राहणार नाहीत याची आदित्य शिरोडकर आणि सचिन अहिर यांनी काळजी घ्यावी, त्यासाठीच उद्धवजींनी तुमच्याकडे पुण्याची जबाबदारी दिली आहे.  राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली तर चांगलंच हे नाहीतर आहेच हे आपलं एकला चलो रे. पण काहीही झालं तरी यावेळी पुण्याचा महापौर शिवसेनाच ठरवणार आहे, अशी गर्जनाही राऊत यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना चंपा चंपा म्हणून एकच घोषणाबाजी केली. राऊत म्हणाले की, 'मी कशाला त्यांचा चंपा म्हणू? ते माझे चांगले राजकीय मित्र आहे. ते माजी म्हणू नका, असं म्हणत असतील तर भावी म्हणू. त्यांची आणि माझी चांगली मैत्री आहे. पण, त्यांच्यावर सव्वा रूपयाचा दावा लावलाय आणि मी कोणताही दावा हरत नाही हे विसरू नका. त्यांच्याकडून सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही. मी कोणताही खटला हरत नाही. दोन वर्षांपूर्वी तुम्हाला हरवून दाखवलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला आहे, असं म्हणत राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. Indian Army : बर्फ वितळल्यामुळे तब्बल 16 वर्षांनंतर जवानाचा मृतदेह दिसला 'उद्धव ठाकरे पहिल्या पाचात आलेत देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहे. हे भाजपने धान्यात घ्यावं. ते म्हणायचे की यांना काय जमणार सरकार चालवणं? आता बघा आमचे सीएम किती लोकप्रिय बनले आहे' असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला. 'तुम्हाला अटक झाली ना, मग अजून काय हवंय. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना ही आग आहे, असं म्हणत राऊत यांनी नारायण राणे यांनाही टोला लगावला. 'अजितदादांचा पहाटेचा कार्यक्रम आता आपण विसरला पाहिजे. भेटा त्यांना आम्ही तुमच्यासोबत आहोत. आपण आता एकत्र सत्तेत आहोत. सत्तेत आल्यावर काही गोष्टी जुळवून घेता आल्या पाहिजे, असं म्हणत संजय राऊत यांनी विजय शिवतारेंच्या नाराजीला समंजसपणाचे उत्तर दिले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या