पुणे, 02 ऑक्टोबर: शिवसेनेचे माजी दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे सुपुत्र युवा सेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि नेता दीपक मारटकर यांच्यावर जीवघेणा हल्ला गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आला. 5 ते 6 हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने रात्री उशिराच्या सुमारास त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दीपक मारटकर गंभीर जखमी देखील झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दीपक रात्री उशिरा जेवण करून घराबाहेर पडले होते. त्याचवेळी घराबाहेर दबा धरून बसलेल्या 5 ते 6 हल्लेखोरांनी रात्री दीडच्या सुमारास त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. डोळे डोके पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर मोटारसायकल वरून पसार झाले. दीपक रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत खाली कोसळले. त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
हे वाचा-एक -दोन नाहीत महाराष्ट्रात घडले 47 'हाथरस'; राज्यातील धक्कादायक आकडेवारी समोर
हल्लेखोरांनी मास्क लावला होता आणि त्यांच्या दुचाकीला नंबरप्लेट ही नव्हती त्यामुळे हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी काही सुराग मिळतात का?याचा तपास सुरू आहे. दरम्यान आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांपर्यंत पोहोचता येईल का याचा तपास पोलीस करत आहेत. या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही परंतु पुण्यातल्या कसबा मतदारसंघात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.
जुलै महिन्यात शिवसेनेचे लढवैये नेते आणि माजी नगरसेवक विजय मारटकर यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. दीपक हे विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.