शिवनेरी गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ मुलीने गळफास लावून केली आत्महत्या

शिवनेरी गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ मुलीने गळफास लावून केली आत्महत्या

किल्ले शिवनेरीवर पहिल्या दरवाज्याजवळ अंदाजे 16 ते 17 वर्षाच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

  • Share this:

जुन्नर, 15 जून : किल्ले शिवनेरीवर पहिल्या दरवाज्याजवळ अंदाजे 16 ते 17 वर्षाच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथील सुहानी रघुनाथ खंडागळे असं या मृत मुलीचं नाव आहे.

गडाच्या पायथ्याशी तिची दुचाकी क्रमांक MH14-W9426 आढळून आली आहे. शिवनेरीवर झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

तसंच सोबत कुकडी व्हॅली पब्लिक स्कुल असं नाव असलेली स्कुल बॅग आढळली आहे. दुचाकी गाडीवर लेण्याद्री असं मागील बाजूस लिहिले आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि याचा पुढचा तपास सुरू आहे.

दरम्यान, हा घातपात की आत्महत्या याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.

 

हेही वाचा...

मुंबईतल्या पालिका शाळेत आता इंग्रजीलाही प्रथम भाषेचा दर्जा!

VIDEO : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा, हाच तो

आज मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महागणार

पोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड

 

First published: June 15, 2018, 9:02 AM IST

ताज्या बातम्या