पुणे 09 जानेवारी : राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलें आणि त्यांची पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह १६ जणांवर शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक असलेल्या या बॅंकेतील पैसे त्यांनी संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट नोंदींच्या आधारे स्वतसाठी वापरले आणि त्यामुळे बॅंकेचे 71 कोटी 78 लाख रुपये रुपयांचे नुकसान झाल्याचं तक्रारींमध्ये म्हटलं गेलंय. बॅंकेत जमा झालेले ठेवीदारांचे पैसे खोट्या नोंदी करुन परस्पर वापरल्याच रिझर्व्ह बँकेने केलेल्या लेखापरीक्षणात उघड झालंय. त्यानंतर ठेवीदाराने दिलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी हा गुन्हा नोंद केलाय.
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच संचालक मंडळ मागेच बरखास्त करण्यात आलं असून रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नेमणुक शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच कामकाज पाहण्यासाठी केलीय. बॅंकेत हजारो ठेवीदारांचे जवळपास तीनशे कोटी रुपये अडकले आहेत. अनिल भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर निवडून गेले असले तरी तीन वर्षांपासून त्यांनी भाजपशी घरोबा केलाय.
या आधी PNB बँकेतल्या घोटाळ्याचं प्रकरण गाजलं होतं. त्यानंतर पुण्यात चंदगड अर्बन निधी बँकेनं लाखोंच्या कर्जाचं अमिष दाखवून गरजू खातेदारांना तब्बल 7 कोटींना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामध्ये आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात येतात पीडित गुंतवणूकदारांनी पुण्यातलं या बँकेचं कार्यालयच फोडलंय. पुण्याच्या केके मार्केट संकुलातलं चंदगड अर्बन निधी बँकेचं ऑफिस सध्या बंद पडलंय.
या खेकड्याच्या नांग्या ठेचा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी
घोटाळा बाहेर आल्याने बँकेसमोर खातेदार जमले असून त्यांनी बँकेच्या कार्यालयातच राडा घातलाय. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच हे सर्व खातेदार चिडलेत... पण बँक संचालक विठ्ठल पेडणेकर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय.
कर्ज मिळण्याच्या आशेपोटी या खातेदारांनी व्याजाने पैसे काढून बँकेची कर्ज पॉलिसी काढलीय. प्रत्येकाकडून अंदाजे 20 ते 40 हजार वसूल करून संचालक विठ्ठल पेडणेकर पळून गेल्याचा आरोप होतोय. कोल्हापुरातही त्याने अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी केलीय.
भगवान गडावर पोहोचताच धनंजय मुंडेंचा पंकजा ताईंना टोला, म्हणाले...
या आधी पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा झाला होता. त्यात शेकडो खातेदारांची कोट्यवधींशी फसवणूक झाली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातल्या या बँकेचा घोटाळा उघडकीस असल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली असून तातडीने कारवाईची मागणी होतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.