निवडणुकीला 10 दिवस असताना काँग्रेसला मोठा धक्का, या दिग्गजांनी धरला भाजपचा हात!

निवडणुकीला 10 दिवस असताना काँग्रेसला मोठा धक्का, या दिग्गजांनी धरला भाजपचा हात!

येत्या निवडणुकीत भाजपाला विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 11 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक अवघी दहा दिवसांवर आली असताना पुण्यातून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवाजीनगर परिसरातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. येत्या निवडणुकीत भाजपाला विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. आधीच पक्षाला गळती लागली असताना नेते आणि कार्यकर्ते अशी साथ सोडत असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये शहराचे माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद चंद्रकांत छाजेड, माजी स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब रानवडे, समाधान शिंदे, हरिश आबा निकम, खडकी कँटोन्मेंटचे नगरसेवक सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत, उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे लहू बालवडकर, ज्येष्ठ कार्यकर्ते दादा कचरे, तुकाराम जाधव यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या दौऱ्यावर होते. भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्वागत केले. खासदार संजयनाना काकडे, शहर भाजपाचे सरचिटणीस गणेश बिडकर आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे या वेळी उपस्थित होते.

सदानंद शेट्टींचा काँग्रेसला दे धक्का

माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते. मात्र, गुरुवारी त्यांनी अचानक भाजपात प्रवेश करत कँटोन्मेंट मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना जाहीर  पाठिंबा दिला. सदानंद शेट्टी यांच्या पत्नी आणि बहिणही यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका राहिल्या आहेत. शेट्टींच्या भाजपा प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांची ताकद वाढली आहे.

इतर बातम्या - आज महाराष्ट्रात राजकीय सभांचा धडाका, पाहा तुमच्या शहरात आहे कोणाची सभा?

तुम्हाला हिशेब द्यावा लागेल.. मुख्यमंत्र्यांनी मतदारांना दिला दम वजा इशारा

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रचाराला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रसवर बोचरी टीका केली आहे. निवडणुका कुणासोबत लढायच्या खरंच कळत नाही आहे. आमचे पैलवान तयार आहेत पण पुढे कुणीच नाही. तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत आणि इकडे शरद पवारांची अवस्था तर 'शोले' सिनेमातील 'जेलर'साखी अर्थात 'आधे इधर जावं आधे उधर जावं बाकी मेरे साथ आव', अशी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यामागे कुणीही नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

इतर बातम्या - नेत्यांच्या जिल्ह्यात शिलेदारांनीच बदलले झेंडे, कोण गाठणार विधानसभा?

गुंतवणुकीबाबत 5 व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. देशातील 25 टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत. 35 लाख रोजगार महाराष्ट्रात तयार झाले असून महाराष्ट्र रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. कुणाला शंका असेल तर केंद्र सरकारची वेबसाईट बघा, असा अजब दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मतदारांनी दिला दम वजा इशारा...

'मी उमेदवार निवडून द्या म्हणून सांगायला आलो नाही. उमेदवार तर निवडून येणारच आहेत. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही रेकॉर्ड करणार आहात काय. 24 तारखेला पुन्हा मी येईन आणि तुम्ही रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून दिले नाही तर तुम्हाला त्याचा हिशेब द्यावा लागेल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी चिंचवडमधील मतदारांना दम वजा इशारा दिली. रेकॉर्ड ब्रेक मतांनीच महायुतीचा उमेदवार निवडून द्याल, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 07:37 AM IST

ताज्या बातम्या