संजय राऊतांचा उदयनराजेंवर हल्लाबोल; म्हणाले, वंशज असल्याचे पुरावे घेऊन या

संजय राऊतांचा उदयनराजेंवर हल्लाबोल; म्हणाले, वंशज असल्याचे पुरावे घेऊन या

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

पुणे,15 जानेवारी:शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे. दैनिक लोकमत पत्रकारिता पुरस्काराचे संजय राऊत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. लोकमत समुहाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा हेही यावेळी उपस्थित होते.

मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. उदयनराजे हे साताऱ्याचे माजी खासदार ते भाजपचे नेते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वंशज आहेत. शरद पवारांना आम्ही जाणते राजे मानतो तर उदयनराजे ना राजे मानतो. शरद पवार हे जाणते राजे जनतेने उपाधी दिली हिंदू हृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेबांना जनतेने दिली आहे. रयतेचा राजा लूटमार करणारे राजे होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उदयनराजे यांना टोला लगावला.

उदयनराजेंची शिवसेनेवर टीका

पुस्तकातल्या मजकुराबद्दल वाईट वाटलं, महाशिवआघाडीतून शिव का काढून टाकलं? शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आली होती का? अशा शब्दात उदयनराजेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेला नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का? शिवाजी महाराज कुणी होऊ शकत नाही. महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान असल्याचेही उदयनराजे यांनी सांगितले आहे.

उदयनराजे भोसले यांनी निशाणा साधला...

भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,' असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी पवारांवर निशाणा साधला होता. शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली. मात्र जगात शिवाजी महाराज यांची उंची गाठता येईल, असे कुणी नाही, असेही उदयनराजे म्हणाले होते. उदयनराजे म्हणाले, कुणालाही 'जाणता राजा'ची उपमा देणं याचा निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष होते, असे सांगत लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? असा सवालही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: January 15, 2020, 2:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading