शिवसेनेनं तोडफोड आंदोलन केलं, पण भलत्याच पीकविमा कंपनीत

शिवसेनेनं तोडफोड आंदोलन केलं, पण भलत्याच पीकविमा कंपनीत

राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम वेळेत दिली नाही म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातलं इफको टोकिओ विमा कंपनीचं कार्यालय फोडलं. पण या कंपनीचा खरीप पीक विम्याशी काही संबंध नाही, असं आता स्पष्ट होत आहे.

  • Share this:

पुणे, 6 नोव्हेंबर : राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम वेळेत दिली नाही म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातलं इफको टोकिओ विमा कंपनीचं कार्यालय फोडलं. पण या वर्षीच्या खरीप हंगामाच्या पीक विमा योजनेत आम्ही सहभागीच नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खातरजमा न करता भलत्याच वीमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा असल्याचं दाखवलं, असं आता बोललं जात आहे.

सुमारे 1 लाख शेतकऱ्यांची 23.92 कोटींची पीकविम्याची रक्कम इफको टोकियो कंपनीकडे प्रलंबित आहे, असा दावा पुण्यात विमा कंपनीची तोडफोड करणाऱ्या शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी केला होता. पण ज्या कंपन्या पिकविमा रक्कम अदा करणार आहेत त्यामध्ये इफको टोकिओ कंपनीचा समावेशच नाही.

वाचा - महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी बातमी, अमित शहांकडून 'इट्स फायनल'

यंदाच्या खरीप हंगामाकरता राज्यात दोन विमा कंपन्यांकडून पीकविमा उतरवण्यात आला होता. त्यामध्ये बजाज अलियान्स आणि अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी या दोन कंपन्यांनी खरीपातला पीकविमा उतरवलेला आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाकडे आहे. याचा अर्थ भलत्याच कंपनीच्या कार्यालयात शिवसेनेनं हे आंदोलन केले आणि नुकसान केलं.

वाचा - प्रेमाचा धक्कादायक अंत, अभिनेत्याने मॉडेल पत्नीला इतकं मारलं की...

2019 साली खरीप हंगामात पीक विमा योजनेत आम्ही सहभागी नाही आणि या आधी 10 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची 549 कोटी इतकी रक्कम दिली आहे, असं इफको टोकिओ कंपनीने स्पष्ट केलं आहे. काही रक्कम प्रलंबित आहे, ती शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या माहितीत काही त्रुटी राहिल्या आहेत म्हणून प्रलंबित आहे, असंही कंपनीचं म्हणणंत आहे. ही रक्कमही त्रुटी दूर झाल्या की अदा केली जाईल, असं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे. याचा अर्थ शिवसेनेनं पुण्यात केलेलं आंदोलन भलत्याच कंपनीत झालं.

VIDEO: पुण्यात शिवसेना कार्यकर्त्यांकडून विमा कार्यालयाची तोडफोड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 6, 2019 10:11 PM IST

ताज्या बातम्या