राज्यात सत्तेच्या वाट्यात एकत्र असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीत इथे मात्र प्रचंड मतभेद!

राज्यात सत्तेच्या वाट्यात एकत्र असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीत इथे मात्र प्रचंड मतभेद!

राज्यात सत्तेत वाट्यात एकत्र असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खेड तालुक्यात मात्र प्रचंड मतभेद आहेत.

  • Share this:

पुणे, 11 जुलै: राज्यात सत्तेत वाट्यात एकत्र असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खेड तालुक्यात मात्र प्रचंड मतभेद आहेत. पंचायत समितीच्या नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतीवरुन दोन्ही पक्षात राजकीय वैर निर्माण झालं आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी व पंचायत समिती सदस्य यांनी शुक्रवारी दुपारी एकत्र येऊन नुतन इमारतीच्या जागेवर असणाऱ्या 19 झाडांना कात्री लावत घोषणाबाजी केली. खेड विभागाच्या उपअभियंत्यास घेराव घालत मंजूर इमारतीचे काम नियोजित जागेत सुरू करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी केलेली घोषणाबाजी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला शहच होता, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा...BMC च्या सहा.आयुक्तांचा कोरोनामुळे मृत्यू, 'हा' रेड झोन आणला होता ग्रीन झोनमध्ये

वाडा रस्त्याच्या पलीकडे जुन्या बांधकाम विभागाच्या कार्यलयाच्या जागेत खेड पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे काम सुरू आहे. या कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी माजी खासदार शिवाजी आढळराव व माजी आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते. दरम्यान विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते हे आमदार झाले आणि मोहिते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा परिसर दाखवून हे काम थांबवून सध्याच्या इमारतीत नवीन आराखडा करण्यास मंजुरी देण्याची मागणी केली. यामुळे हे काम रखडले आहे.

खेड पंचायत समितीच्या नूतन इमारत जागेवरुन मागील सहा महिन्यांपासून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने येऊन लढत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड पंचायत समिती परिसरात पाहाणी करुन नियोजित जागेवर पंचायत समितीचे काम न करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पंचायत समितीतील नियोजित जागेवरील परवानगी घेऊन 19 झाडे तोडण्यात आली. लवकरच त्या जागेवर पंचायत समितीची इमारत उभी राहणार असल्याचे शिवसेना तालुकाध्यक्ष रामदास धनवटे यांनी घोषणा केली आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे, तालुकाध्यक्ष रामदास धनवटे, महिला आघाडी अध्यक्ष विजया शिंदे, उर्मिला सांडभोर,पंचायत समिती उपसभापती ज्योती अरगडे, सदस्य भगवान पोखरकर, वैशाली जाधव उपस्थितीत होते

खेड पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. माजी आमदार व माजी खासदार यांच्या प्रयत्नातून खेड पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्धाटन विधानसभा निवडणुकीपुर्वी करण्यात आले होते. मात्र वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरी पंचायत समितीच्या कामाला सुरुवात झाली नाही. शुक्रवारी अचानक शिवसेना पदाधिकारी व पंचायत समिती सदस्यांचा मोर्चा पंचायत समितीवर आला व नूतन इमारतीच्या जागेवर असणाऱ्या 19 झाडांची तोडणी करण्याची परवानगी मिळाल्याने झाडांना कात्री लावण्यात आली.

हेही वाचा...विरोधी नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरताहेत, आदित्य यांचा फडणवीसांना टोला

पंचायत समितीच्या नूतन इमारतीवरून सुरु झालेल्या वादात शिवसेनेने पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असल्याने विरोध करणारी राष्ट्रवादी काँग्रेस पुढील काळात काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 11, 2020, 7:35 PM IST

ताज्या बातम्या