Elec-widget

राज्यातल्या सत्ता स्थापनेसाठी शरद पवार आणि सोनिया गांधी उद्या पुन्हा भेटणार!

राज्यातल्या सत्ता स्थापनेसाठी शरद पवार आणि सोनिया गांधी उद्या पुन्हा भेटणार!

'राज्यातली राष्ट्रपती राजवट जावून तिथे लवकरात लवकर स्थित सरकार यावं अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे.'

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, पुणे 17 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी जी कोंडी निर्माण झाली. ती कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस्या अध्यक्षा सोनिया गांधी उद्या भेटणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोअर कमेटीची रविवारी पुण्यात तब्बल दोन तासांपेक्षा जास्त वेळ बैठक चालली. ही बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, आजच्या बैठकीत राज्यातल्या स्थितीवर आम्ही विस्तृत चर्चा केली. सर्व मुद्दे चर्चेत आले. काँग्रेसला विश्वासात घेऊनच पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह महत्त्वाचे सर्व नेते उपस्थित होते. राज्यातली राष्ट्रपती राजवट जावून तिथे लवकरात लवकर स्थित सरकार यावं अशी राष्ट्रवादीची इच्छा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार आणि सोनिय गांधी यांच्या भेटीनंतर मंगळवारी दोन्ही पक्षांच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक होईल आणि त्यानंतरच पुढे जाता येईल असंही ते म्हणाले. दरम्यान या बैठकीला जाण्याआधी अजित पवारांनी बारामतीतच आपलं मत व्यक्त केलं. होतं.

पुण्यात मोदीबागेत असलेल्या शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या कोअर कमेटीची बैठक सोमवारी पार पडली. ही बैठक तब्बल अडीत तास चालली.

पुण्यात मोदीबागेत असलेल्या शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या कोअर कमेटीची बैठक सोमवारी पार पडली. ही बैठक तब्बल अडीत तास चालली.

राष्ट्रवादीत 'ते' उमेदवारही झाले आमदार, अजित पवारांनी सांगितला गंमतीशीर किस्सा

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विश्वासावर शिवसेने NDAमधून बाहेर पडली मात्र सत्ता स्थापनेचं अजुन काहीच ठरेना. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरूच असून त्यातून अजुनतरी काहीही ठोस निघण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळेही आता शिवसेनेच्या चिंतेत वाढ झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अजुन काहीही ठरलेलं नाही. असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. माध्यमांनी उगाच नको त्या चर्चा करून नये असंही ते म्हणाले. अजित पवार म्हणाले, आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फुाटाफूट होणार नाही. काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय. त्यामुळे आता कुणी असं करणार नाही. कर्नाटकचा निकाल काय लागला हेही जनतेने पाहिले आहे. जर कुठल्या पक्षाने कुठल्या पक्षाचे आमदार फोडले तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पाडाव करतील.

Loading...

 देवेंद्र फडणवीसांनी टाळली उद्धव ठाकरेंची भेट

काही फॉर्म्युला ठरला याबद्दलच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. अद्याप काहीही ठरलेलं नाही. याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत या सगळ्या वावड्याच आहेत. आता 19 नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि पवारसाहेबांची भेट होईल. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...