पुणे, 24 फेब्रुवारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी वर्णात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यूपीएससीच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आंदोलन करत हा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची मागणी केली होती. अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आलं असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सुधारीत परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात पुढाकार घेत विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती. सुधारीत परीक्षा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या निर्णय घेण्यात आल्यानंतर आता यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
हा एमपीएससीसंदर्भातील प्रश्न होता. मी मुलांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यानंतर आयोगाच्या प्रमुखांशी बोललो. दोन्ही बाजू अनुकूल वाटल्या त्यामुळे बैठक घेण्याची गरज नव्हती. मला लोकसेवा आयोगाची भूमिका अनुकूल वाटल्यानं बैठक झाली नाही, यात श्रेय घेण्याचा प्रश्न नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
'पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा'; राज्यातील 21 काँग्रेस नेत्यांनी घेतली चिन्निथालांची भेट
भावी मुख्यमंत्री पोस्टरवर प्रतिक्रिया
दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयाबाहेर लागलेल्या भावी मुख्यमंत्री पोस्टरवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे असे पोस्टर लावण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी असेच पोस्टर अजित पवार यांचे देखील लावण्यात आले होते. ज्यामध्ये अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाच घरातील दोन व्यक्तींची पोस्टर लावणे हा खोडसाळपणा असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam, Sharad Pawar