अनिस शेख, (प्रतिनिधी)
पुणे, 29 जून: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाला भीषण अपघात झाला आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर किलोमीटर 46 जुन्या अमृतांजन ब्रीजजवळ हे अपघात झाला आहे. सुदैवानं मोठी घटना टळली.
मिळालेली माहिती अशी की, मुंबईकडे जात असताना शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाला आहे. वाहनात चार पोलिस कर्मचारी होते. त्यापैकी तिघे सुखरूप असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, पोलिस वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे.
हेही वाचा...बडा नेता 'मोस्ट वॉंटेड' म्हणून घोषित, पोलिसांनी जाहीर केली जहाल माओवाद्यांची यादी
दरम्यान, मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर सोमवारी पहाटेपासून घडलेला हा दुसरा अपघात आहे. आजचा दिवस अपघाताचा वार ठरला आहे. आज पहाटे घडलेल्या भीषण अपघातानंतर खंडाळा घाटात पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.
A vehicle in Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar's convoy overturned on Mumbai-Pune Expressway, earlier today. Pawar's vehicle passed on safely. The driver of the vehicle that overturned received minor injuries: Pune Rural Police #Maharashtra pic.twitter.com/KdlSIfSp6C
— ANI (@ANI) June 29, 2020
खंडाळा घाटात जुन्या अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला. पुण्यातील पोलीस कर्मचारी मुंबईकडे येत होते. त्यावेळे अचानक वाहनावरील ताबा सुटला आणि महामार्गाच्या मधोमध गाडी पलटी झाली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. तर तीन जण सुखरूप आहे. सुमो गाडी पलटी झाल्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यानंतर अपघातग्रस्त सुमो गाडी महामार्गावरून हटवण्यात आली.
हेही वाचा...कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठा दहशवादी हल्ला, 9 जण ठार
भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे एका भीषण अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. खालापूर टोल नाक्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने पुढे जाणाऱ्या स्विफ्ट तसेच टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Pune news, Sharad pawar