मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

..म्हणून हे सर्व चाललंय; अजित पवार आणि नातेवाईंकांशी संबंधित छापेमारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

..म्हणून हे सर्व चाललंय; अजित पवार आणि नातेवाईंकांशी संबंधित छापेमारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि त्यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर विभागानं आज छापेमारी सुरू केली. त्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

पुणे, 07 ऑक्टोबर : माझ्या ऐकण्यात आलंय की, माझे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केलीय. माझ्या मते हे जे काही घडतंय, त्याला उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याची पार्श्वभूमी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी केंद्रावर टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि त्यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर विभागानं आज छापेमारी सुरू केली. त्यात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि तीन बहिणींचाही समावेश आहे. त्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. पवार पुढे म्हणाले की, शेतकरी आपली भूमिका मांडण्यासाठी जात असताना सत्ताधारी पक्षातील घटकांची वाहने त्यांच्या अंगावर जातात आणि त्यामध्ये काही शेतकरी चिरडून ठार होतात. हे यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. साहजिकच याचा सर्वांनी निषेध केला. महाराष्ट्र सरकारनेही मंत्रीमंडळ बैठकीत निषेध केला. मीही याबद्दल तीव्रतेने बोललो. याची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली.  त्याचा संताप किंवा राग सत्ताधारी पक्षातल्या लोकांना आलाय. त्याच्या प्रतिक्रिया म्हणून आता जे काही चाललंय, त्या सगळ्या गोष्टी होत असण्याती शक्यता नाकारता येत नाही. हे वाचा - Pune Job Alert: वैदिक संशोधन मंडळ पुणे इथे ‘या’ पदांसाठी जागा रिक्त; तब्बल 39 हजार रुपये मिळणार पगार मी अजित पवार यांचं विधान वाचलं आहे. कर वसुली करण्यासाठी जर कोणाला काही शंका येत असेल तर त्यासंबंधीच्या चौकशी करण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर कुणासंदर्भात करायचा, त्या संस्था किंवा त्याच्याशी संबंधित प्रमुख असतील त्यांच्यासाठी असायला हवा. परंतु, या व्यवहाराशी संबंध नसलेल्या मुलींवरही छापे टाकणं हा या अधिकाराचा अतिरेक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संख्या बहिणींची नावे निता पाटील - पुणे विजया पाटील - कोल्हापूर चुलत बहीण रजनी इंदुलकर - पुणे हे वाचा - आर्यन खानला पाठिंबा देणाऱ्या हृतिकवर drama queen कंगनाने साधला निशाणा साहजिकच लोकांनीच असा विचार केला पाहिजे की, या प्रकारे अधिकारांचा गैरवापर हा किती दिवस सहन करायचा.  काही लोक याबद्दल वेडीवाकडी भाष्य करून, आरोप करून काहीही बोलतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय संस्था त्याबद्दल कारवाई करण्यासाठी पुढे येतात हे सर्वात आक्षेपार्ह आहे, असे ते म्हणाले.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Ajit pawar, Income tax, Sharad pawar

पुढील बातम्या