दौरा अर्धवट सोडून शरद पवार निघाले अजित पवारांच्या भेटीला, करणार मनधरणी

दौरा अर्धवट सोडून शरद पवार निघाले अजित पवारांच्या भेटीला, करणार मनधरणी

यापूर्वीही कुटुंबप्रमुख म्हणून मी सांगितलेली एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरूध्द जरी असली तरी त्यांनी ती ऐकलीय. आताही ते ऐकतील असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

वैभव सोनावणे, पुणे 27 सप्टेंबर : अजित पवारांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शरद पवार आपला पुणे दौरा अर्धवट टाकून मुंबईकडे रवाना झाले. पत्रकार परिषदेनंतर शरद पवार हे मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे अजित पवार हे मुंबईत आहेत असं स्पष्ट होतंय. अजित पवारांची भेट घेऊन ते त्यांचं मन वळविणार आहेत. रात्री उशीरा शरद पवार हे अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी राजीनाम्याचा निर्णय हा कुणालाही न विचारचात घेतला. त्यांनी सल्लामसलत केली नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. तसच सध्याच्या राजकारणाला अजित पवार हे कंटाळले आहेत. त्यामुळे राजकारण सोडून आता शेती किंवा उद्योग करावा असं त्यांच्या मनात असल्याचंही पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळे अजित पवार हे संन्यास घेणार का असा प्रश्न विचारला जातोय.

उदयनराजेंना शह देण्यासाठी 'या' तीन नावांचा विचार, शरद पवारांच्या वक्तव्याने नवी

अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झालाय. अजित पवारांनी या निर्णयाची कल्पना कुणालाच दिली नव्हती असं आता स्पष्ट झालंय. खुद्द शरद पवारांनीच पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय.  माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे अजित पवार हे अस्वस्थ होते. राजकारणाची पातळी खालावली याचंही त्यांना दु:ख होतं. ज्या शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था  उत्तमपणे चालवल्या त्या कामावरच डाग लागल्याने अजित पवार हे अतिशय अस्वस्थ होते. एवढं काम करूनही जर असं होत असेल तर त्यापेक्षा आपण शेती आणि उद्योग करू असं त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं होतं अशी माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे अजित पवारांचे हे राजकारणाचे संकेत आहेत का अशी आता चर्चा सुरू झालीय.

शरद पवार पुढे म्हणाले, अजित पवारांचा आक्रमकपणे आणि घाईने निर्णय घेण्याचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असावा. माझा अजित पवारांशी संपर्क झाला नाही. मात्र कुटुंब प्रमुख म्हणून मी अजित पवारांशी बोलून त्यांची समजूत काढेण असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. यापूर्वीही कुटुंबप्रमुख म्हणून मी सांगितलेली एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरूध्द जरी असली तरी त्यांनी ती ऐकलीय. आताही ते ऐकतील असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांना भाजप किंवा रिपाइंमधून ऑफर नाही, रामदास आठवलेंचा टोला

नेमकं काय झालं?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदराकीचा राजीनामा दिलाय. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पवारांचा राजीनामा मंजूर केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात झाली असतानाच पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार 'नॉट रिचेबल' आहेत. त्यांचा फोन बंद असून त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलंय. त्यामुळे नेमकं काय झालं याबद्दल सस्पेन्स वाढला असून राष्ट्रवादीत भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी ई मेलवरून बागडेंना राजीनामा पाठवला आणि त्यांच्याशी फोनवर बोलून घेतलं. अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याविरुद्ध ED ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. राजीनामा पत्रात कारण नाही दिलेले, फक्त राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केली. विधानसभा अध्यक्ष यांनी राजीनामा मंजूर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2019 10:20 PM IST

ताज्या बातम्या