मराठी बातम्या /बातम्या /पुणे /मुलांना लग्नासाठी मुली का मिळत नाहीत? शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

मुलांना लग्नासाठी मुली का मिळत नाहीत? शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

शरद पवार

शरद पवार

मुलांना लग्नासाठी मुली का मिळत नाहीयेत? याबाबतचा किस्सा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात सांगितला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 4 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रेला पुण्यातून सुरूवात झाली आहे. महागाई आणि बेरोजगारीविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. महिला धोरण आणल्याबद्दल या यात्रेत शरद पवार यांचा सत्कारही करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सध्या मुलांना लग्नासाठी मुली का मिळत नाहीत? याचं कारण सांगितलं. बीडवरून येत असतानाचा किस्सा शरद पवारांनी सांगितला.

'मी एकेदिवशी बीड वरून येत होता. तेव्हा दुपारच्या वेळी 25 ते 30 तरुण बसली होती. मी तिथं माझी गाडी थांबवली अन त्यांना विचारलं असं का बसला आहात. ते म्हणाले आम्ही पदवीधर, उच्च पदवी घेतलेली आहे. मग तुम्ही काय करता तुमची लग्न झालेली आहेत का? ते म्हणाले, आम्ही बेरोजगार आहोत त्यामुळे मुली विचारतात तुम्ही काय करता? यावर आमच्याकडे उत्तर नाही. हीच बेकारी घालवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा, त्यासाठी या सरकारची तयारी नाही,' असं शरद पवार म्हणाले.

'जातीजातीत तेढ निर्माण करायची, दोन धर्मांमध्ये अंतर पाडायचं. कारण यांच्यात कोणती धमक नाही, त्यामुळे मूळ प्रश्नापासून अन्य विषयांकडे लक्ष वेधत आहेत. यासाठी जात, धर्म, भाषा हे मुद्दे पुढे काढतात. तुम्ही उद्यापासून महाराष्ट्र दौरा करताय, तिथं प्रामुख्याने असे सर्व मुद्दे मांडा', असं शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

चंद्रकांत पाटलांना टोला

या कार्यक्रमात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनाही टोला हाणला. 'महाराष्ट्रातील माणूस कधी भीक मागत नाही. एका नेत्याने सांगितलं महापुरुषांनी भीक मागितली, पण महाराष्ट्रातील माणूस मोठ्या हिंमतीने कष्ट करून संकटावर मात करतो,' असं प्रत्युत्तर शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना दिलं.

'या देशात समाज परिवर्तन करण्याचं काम काळ अनुकूल नसताना ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी केलं. महात्मा फुले आधुनिकता, विज्ञान या सगळ्यांचे पुरस्कर्ते होते. शेती खात्याचा मंत्री झाल्यावर या क्षेत्रात सगळ्यात चांगलं काम कुणी केलं याची माहिती घेत होतो, याचं रेकॉर्ड पाहत असताना मला आढळलं शेती क्षेत्रात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी चांगलं काम केलं,' असं शरद पवार म्हणाले.

विधानसभा आणि लोकसभेत 50 टक्के आरक्षण मिळालं पाहिजे, स्त्रियांना संधी द्या, तुम्हाला त्या कतृत्व दाखवतील, असा विश्वास शरद पवारांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.

First published:

Tags: NCP, Sharad Pawar