• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • 'ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर कशाला बोलू?' नाना पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

'ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर कशाला बोलू?' नाना पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar reaction on Nana Patole: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे.

 • Share this:
  बारामती, 11 जुलै : महाविकास आघाडी सरकारम (MVA Government)ध्ये शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्र असले तरी तिन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून (Congress Party) स्वबळाचा नारा सुद्धा दिला जात आहे. याच दरम्यान नाना पटोले (Nana Patole) यांनी एका कार्यक्रमात थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) टीका केली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले शरद पवार? शरद पवारांना नाना पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, "या गोष्टींमध्ये मी पडत नाही. ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर सोनिया गांधी काय बोलल्या असत्या तर मी बोललो असतो." काय म्हणाले होते नाना पटोले? लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते, पुण्याचे पालकमंत्री हे बारामतीकर आहेत. अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे करत नाही. यामध्ये संपर्क नेत्यांनी लक्ष घालावे असं आपण म्हणतो पण शेवटी त्यांचे ऐकायचे की नाही हे सुद्धा तेच ठरवत असतात. कामासाठी संपर्कमंत्र्यांची नाही तर पालकमंत्र्यांची सही लागते. हे सर्व लक्षात घेत आपली ताकद कशी वाढवता येईल याकडे लक्ष द्या. पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्व पक्षांना शरद पवारांनी म्हटलं, प्रत्येक जण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही. त्यामुळे ते आपलं बळ वाढवम्याचा प्रयत्नात असणार. शिवसेनेने भूमिका घेतली यात काहीही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. पक्ष प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या स्वत:च्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार आहे. यामध्ये काहीही चुकीचे नाही.
  Published by:Sunil Desale
  First published: