पुणे, 15 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना डिवचलं आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा शरद पवारांनी समाचार घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील दादागिरी आणि मक्तेदारी संपवल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते, त्यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
'चंद्रकांत पाटील हे एक शक्तीमान गृहस्थ आहेत, त्यावर मी काय बोलणार. ज्यांची साधी स्वत:च्या जिल्ह्यात निवडून येण्याची क्षमता नाही म्हणून ते कोथरूडला आहे आहेत. आता कोथरूडसाठी त्यांनी काय योगदान दिलं आहे, हे कोथरूड वासियांनाच विचारा,' असा टोला शरद पवारांनी हाणला.
शरद पवार यांच्याहस्ते महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा पुण्यात सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यानंतर शरद पवार माध्यमांशी बोलत होते. पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या घोळावरही भाष्य केलं.
'मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता पण..' निलंबनानंतर सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रिया
'काँग्रेसने हा पक्षांतर्गत घोळ टाळायला हवा होता. पक्षाबाहेरचे कोण या खेळीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ते खुशाल घ्यावं. फडणवीस या वादात काय म्हणतात, यावर मी बोलणार नाही,' असं शरद पवार म्हणाले.
'माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. हे चित्र जे दिसत आहे ते काळजी करण्यासारखं आहे. मला जागेबाबत माझ्या पक्षाने कळवलं होतं, आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचं ठरवलं होतं. नागपूरमध्ये आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ. नाशिकबाबत मला अधिक माहिती नाही', असं शरद पवारांनी सांगितलं.
'काँग्रेसने ज्याला तिकीट दिलं होतं, त्याने काम देखील केलं आहे. त्या ठिकाणी तरुण कार्यकर्त्याला संधी दिली. तांबे हे काही पक्षाच्या बाहेरचे नाहीत. बसून वाद मिटवता आला असता, अजूनही वाद मिटवता येऊ शकतो,' असं विधान शरद पवार यांनी केलं.
सुधीर तांबेंना काँग्रेसचा पहिला धक्का, सत्यजीत तांबे मात्र वेटिंगवर!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrakant patil, Sharad Pawar