पुणे, 2 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यानंतर काही वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होते. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अजित पवारांचं नावही घेतलं नाही. शरद पवार म्हणाले की, काही सहकाऱ्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली, आम्हीच पक्ष असल्याची भूमिका मांडली. माझं स्वच्छ मत आहे, पक्षातील काही सदस्य तिथे जाऊन भूमिका घेतली. ते विधीमंडळात होते, आता पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये चित्र समोर येईल, त्याचं कारण ज्यांची नावं आली, त्यांनी संपर्क साधला, आम्हाला इथं बोलावून आमच्या सह्या घेतल्या, पण आमची भूमिका वेगळी आहे. त्याचा खुलासा आमच्याकडे केला आहे. याबद्दल काही बोलणार नाही, पण याचं स्वच्छ चित्र जनतेच्या समोर मांडण्याची गरज आहे, तर ते मांडलं तर माझा विश्वास बसेल, जर मांडला नाही, वेगळी भूमिका घेतली, असा निष्कर्ष काढेल हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. 1986 साली निवडणुकीनंतर पक्षांचं नेतृत्व करत होतो. त्यावेळी 58 आमदार निवडून आले होते. त्यावेळी 6 सोडले तर सगळे मला सोडून गेले होते. मी त्या 58 चा विरोधी पक्षनेता होते, मी 5 लोकांचा नेता झालो. 5 लोकांना घेऊन मी पक्ष बांधायला महाराष्ट्रात बाहेर पडलो, माझा उद्देश होता की पक्ष वाढवयाचा होता. आज तितकीच संख्या आली. जे पक्ष सोडून गेले ते फरार झाले होते. 1986 नंतर पुन्हा पक्ष कसा उभा राहिल यासाठी माझा एककलमी कार्यक्रम असणार आहे. आज या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे एक आहोत, इथं येण्याआधी ममतादीदी, काँग्रेसचे नेते खरगे यांचा फोन आला. एक पर्यायी शक्ती उभी करण्याची गरज आहे. आजचा दिवस संपला, उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे, कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहे. कराडमध्ये दलित समाजाचा मेळावा घेणार आहे. जेवढे लोकांशी संपर्क वाढवता येईल, ते माझे काम आहे. मला काहीही म्हणणं नाही, कुणी काहीही दावा केला, तो मला मान्य नाही, मला लोकांवर विश्वास आहे, त्या लोकांमध्ये जाऊन तो निर्णय लोक ठरवतील. ज्यांना इतिहास नीट माहिती नाही, हा पक्ष नव्हता, आमचे काही काँग्रेसशी मतभेद झाले होते, त्यातून पक्ष स्थापन झाला होता. त्यामुळे कुणी काहीही क्लेम करो, आम्ही लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडणार आहोत. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला याची बातमी तुमच्याकडून कळलली. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा आमच्याकडे दिला नाही, ते देण्याचं ठिकाण हे विधानसभा अध्यक्ष असतात. विरोधी पक्ष नेत्यांची नेमणूक ही संख्या असल्यावर ते करत असतात. जर त्यांच्याकडे राजीनामा दिला असेल तर आम्हाला ताण घेण्याचं कारण नाही, तो दिला असेल त्यामुळे काही भाष्य करण्याचे कारण नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







