जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Sharad Pawar PC : अजितदादांच्या बंडाला पवारांचा पाठिंबा नाहीच? पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका

Sharad Pawar PC : अजितदादांच्या बंडाला पवारांचा पाठिंबा नाहीच? पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका

अजितदादांच्या बंडाला पवारांचा पाठींबा नाहीच?

अजितदादांच्या बंडाला पवारांचा पाठींबा नाहीच?

Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह बंड केलं आहे. या बंडाला शरद पवार यांचा पाठींबा नसल्याचे बोलले जात आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 2 जुलै : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार यांच्या बंडाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठींबा असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, शपथविधीआधी शरद पवारांनी बंडाचा दावा फेटाळून लावला होता. आता लवकरच ते पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडणार आहेत. शरद पवार यांचा बंडाला पाठींबा नाहीच? अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बंडाला शरद पवार यांचा पाठींबा नसल्याची सुत्रांची माहिती आहे. अजित पवारांच्या पत्रकार परिषद ऐकूणच शरद पवार प्रेसला सामोरं जाणारं असल्याची माहिती आहे. ईडीच्या भीती दाखवूनच भाजपने राष्ट्रवादी फोडला, अशी भूमिका शरद मांडू शकतात. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधी होण्याआधी पवार यांनी आपली भूमिका मांडली होती. काय म्हणाले होते शरद पवार? अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंड केल्याचं विचारलं असता शरद पवारांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मला आजच्या बैठकीचे नियोजन काय आहे, माहिती नाही. पण विरोधी पक्ष नेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा आधिकार आहे. त्यांनी बैठीक बोलवली आहे. काय चर्चा होइल हे रात्री माहिती घेउन सांगतो, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. तर सुप्रिया मुंबईवरुन पुण्याला यायला निघाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष पदाविषयी आणि त्या संदर्भात संबधित मी 6 तारखेला बैठक बोलावली आहे. ज्यात संघटनात्मक बांधणी करण्यावर चर्चा करणार आहोत. संघटनेत बदल करण्याची गरज आहे का? यावर विचार होणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अजित पवारांनी काही सूचना दिल्या आहेत, त्यादेखील विचारात घेतल्या जातील. दिल्लीला मी पण गेलो ते पण गेले आणि जयंत पाटील पण गेले होते. पण अशोक पवार यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. ते सगळ्यांच्या समोर बोलले की त्यांना संघटनेत काम करण्याची इच्छा आहे. बैठकीत निर्णय होईल मी एकटा घेतं नाही. पक्ष फुटू शकतो का तर असं तुम्हाला वाटतं आम्हाला नाही. चर्चा कोण घडवत आहे, माहिती नाही. पण आम्ही चर्चा करत नाहीत, असं बोलून बंडाचा दावा पवार यांनी फेटाळून लावला होता. मात्र, आता हा दावा खोटा ठरला असून अजित पवार यांच्यासह पक्षातील 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात