पुणे, 5 जानेवारी : महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचं भाकीत केलं आहे. मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, असा सुतोवाच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला आहे. पुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही माहिती दिली आहे.
मे महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं, असे आदेश शरद पवारांनी दिले आहे. शरद पवार आज पुण्यामध्ये होते त्वाह त्यांनी तालुका निहाय बैठका घेतल्या.
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मिनी विधानसभा निवडणूक म्हणून पाहिलं जातं. पण प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे, त्याच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल.
राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकींची प्रभाग रचना नव्याने होणार आहे. एकीकडे राज्य सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले असतानाच दुसरीकडे ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रलंबित निवडणुका त्वरित घेण्याची विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टासमोर आहे.
ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील मिळाला तरी 92 नगरपरिषदांसाठी हा निर्णय लागू होणार नव्हता, त्यामुळे राज्य सरकारने या 92 नगरपरिषदांसाठीही ओबीसी आरक्षण लागू व्हावं, अशा मागणीची पुनर्विलोकन याचिका दाखल केली.
'ताई नको दादा हवे', शरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची खदखद बाहेर!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, Sharad Pawar