Home /News /pune /

अन्वय नाईक कुटुंबीयांसोबतच्या Viral Photoवर शरद पवारांनी केला खुलासा

अन्वय नाईक कुटुंबीयांसोबतच्या Viral Photoवर शरद पवारांनी केला खुलासा

'राज्यपालांनी अर्णब यांची विचारपूस केली त्यामुळे बरं वाटलं. पण ज्या घरात दोन आत्महत्या झाल्या त्यांचीपण विचारपूस केली असती तर आणखी बरं वाटलं असतं'

पुणे 10 नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab goswami) यांच्या अटकेनंतर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या (Anvay naik suicide case) प्रकरणाची नव्याने चर्चा सुरू झाली. सोशल मीडियामध्येही त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. ही चर्चा सुरू असतानाच नाईक कुटुंबीयांचा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर आणि WhatsApp ग्रुप्सवर व्हायरल झाला होता. नाईक कुटुंबीयांनी पवारांची भेट घेतली आणि त्यानंतरच कारवाईला सुरूवात झाली असं त्यामधून सूचित करण्यात येत होतं. आता खुद्द शरद पवारांनीच त्या फोटोबद्दल खुलासा केला आहे. पवार म्हणाले, सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो हा 5 वर्ष जुना आहे. तो आत्ताचा नाही. राज्याच्या राज्यपालांनी अर्णब यांची विचारपूस केली त्यामुळे बरं वाटलं. पण ज्या घरात दोन आत्महत्या झाल्या त्यांचीपण विचारपूस  केली असती तर आणखी बरं वाटलं असतं असा टोलाही त्यांनी लगावला. पुण्यातल्या हडपसर येथे अॅमनोरा पार्क टाऊन मधल्या चतुर्भुज नरसी शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. आणखी काय म्हणाले पवार? बिहारमध्ये तेजस्वी आणि नितीश कुमार यांच्यातच थेट लढत होती. त्यामुळे आम्ही तिथे काही फारसं लक्ष घातलं नाही. तेजस्वी यादवला आम्ही मोकळीक दिली होती असंही पवारांनी सांगितलं. तेजस्वी यादवने ज्या प्रकारे लढत दिली ती युवकांसाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे. नितीश कुमारांच्या जेडीयूला मोठा फटका बसेल असेलं असं बोललं जात होतं मात्र तसं होताना दिसत नाही असंही ते म्हणाले. भाजपला या निवडणुकीत चांगला फायदा झाला असं मतही त्यांनी व्यक्त केलं. बिहारमध्ये भाजपला देवेंद्र फडणवीसांमुळे फायदा झाला असं म्हटलं जातं, तुमचं मत काय आहे असा प्रश्न विचारल्यावर पवार आपल्या खास शैलीत म्हणाले,  देवेंद्र फडणवीसांमुळे चमत्कार झाला हा प्रकाश तुमच्यामुळे आमच्या डोक्यात पडला.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या