जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Sharad Pawar PC : अजित पवारांसह 9 जणांवर कारवाई होणार का? शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar PC : अजित पवारांसह 9 जणांवर कारवाई होणार का? शरद पवार स्पष्टच बोलले

अजित पवारांसह 9 जणांवर कारवाई होणार का?

अजित पवारांसह 9 जणांवर कारवाई होणार का?

Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 2 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. बंडामध्ये शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांचाही समावेश असल्याने पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावेळी अजित पवारांवर कारवाई करणार का? यावरही पवारांनी भाष्य केलं आहे. अजित पवारांवर कारवाई करणार का? अजित पवारांच्या बंडानंतर त्यांच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. पवार म्हणाले, हा पक्षाच्या धोरणाचा निर्णय नाही, ती पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यासाठी पक्षाचे प्रमुख लोक आहेत, ते बसतील आणि निर्णय घेतली. त्यामुळे बाकीचे नेते आहेत. जयंत पाटील यांच्याशी बोलून निर्णय घेतील. मी पक्षप्रमुख म्हणून जनरल सेक्रेटरी म्हणून सुनील तटकरे यांची निवड केली आहे. कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक केली आहे. माझं त्यांना सांगणं आहे, पक्षासाठी जी पावलं टाकली पाहिजे होती, ती त्यांनी टाकली नाही. त्यामुळे ज्यांनी जबाबदारी टाकली त्यांचा आता विश्वास राहिला नाही. त्यासाठी उचित कारवाई करावी, नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागले. पक्षाच्या चौकटीबाहेर गेले, चौकट घेऊन गेले, त्या प्रत्येकांचा निकाल घ्यावा लागेल. 9 लोकांचा आणि प्रत्येकाचा निकाल घ्यावा लागणार आहे. वाचा - पवारांची पुन्हा गुगली, शपथविधीआधी आमदारांनी केला फोन, 2 दिवस थांबा मग.. काय म्हणाले शरद पवार? शरद पवार म्हणाले, एकदा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं, ते राष्ट्रवादीबद्दल सुद्धा होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे. त्यांनी राज्य सरकारचा उल्लेख केला. त्यामुळे जलसंपदा खात्यात ती तक्रार होती, त्याचा उल्लेख केला. भ्रष्टाचाराचा आरोप केला, आज मला आनंद राष्ट्रवादीच्या काही आमदारांना शपथ दिली. त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हतं, या आरोपांमधून पक्षाला आणि त्या आमदारांना मुक्त केलं,. त्याबद्दल पंतप्रधान मोदींचा आभारी आहे, अशी गुगली शरद पवार यांनी टाकली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आता राहिला दुसरा राष्ट्रवादी पक्षाचा प्रश्न… : शरद पवार हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. 1986 साली निवडणुकीनंतर पक्षांचं नेतृत्व करत होतो. त्यावेळी 58 आमदार निवडून आले होते. त्यावेळी 6 सोडले तर सगळे मला सोडून गेले होते. मी त्या 58 चा विरोधी पक्षनेता होते, मी 5 लोकांचा नेता झालो. 5 लोकांना घेऊन मी पक्ष बांधायला महाराष्ट्रात बाहेर पडलो, माझा उद्देश होता की पक्ष वाढवयाचा होता. आज तितकीच संख्या आली. जे पक्ष सोडून गेले ते फरार झाले होते. 1986 नंतर पुन्हा पक्ष कसा उभा राहिल यासाठी माझा एककलमी कार्यक्रम असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात