पुणे, 2 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांचाही समावेश असल्याने पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. या नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. पत्रकार परिषद घेत पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. काय म्हणाले शरद पवार? शरद पवार म्हणाले, एकदा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं, ते राष्ट्रवादीबद्दल सुद्धा होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे. त्यांनी राज्य सरकारचा उल्लेख केला. त्यामुळे जलसंपदा खात्यात ती तक्रार होती, त्याचा उल्लेख केला. भ्रष्टाचाराचा आरोप केला, आज मला आनंद राष्ट्रवादीच्या काही आमदारांना शपथ दिली. त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हतं, या आरोपांमधून पक्षाला आणि त्या आमदारांना मुक्त केलं,. त्याबद्दल पंतप्रधान मोदींचा आभारी आहे, अशी गुगली शरद पवार यांनी टाकली आहे.
पुढे पवार म्हणाले की, त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पक्षाची भूमिका मांडली, त्या पक्षाच्या विरोधात घेतली, उद्याच्या 6 तारखेला महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्याची बैठक बोलावली होती. त्यावेळी काही प्रश्न उपस्थितीत केले होते. संघटनात्मक बदल केल्याचा विचार केला होता. पण प्रश्न केले गेले होते. पण त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली, आम्हीच पक्ष असल्याची भूमिका मांडली. माझं स्वच्छ मत आहे, पक्षातील काही सदस्य तिथे जाऊन भूमिका घेतली. ते विधीमंडळात होते, आता पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये चित्र समोर येईल, त्याचं कारण ज्यांची नावं आली, त्यांनी संपर्क साधला, आम्हाला इथं बोलावून आमच्या सह्या घेतल्या, पण आमची भूमिका वेगळी आहे. त्याचा खुलासा आमच्याकडे केला आहे. याबद्दल काही बोलणार नाही, पण याचं स्वच्छ चित्र जनतेच्या समोर मांडण्याची गरज आहे, तर ते मांडलं तर माझा विश्वास बसेल, जर मांडला नाही, वेगळी भूमिका घेतली, असा निष्कर्ष काढेल. वाचा - …म्हणून सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला; अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट आता राहिला दुसरा राष्ट्रवादी पक्षाचा प्रश्न… : शरद पवार हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. 1986 साली निवडणुकीनंतर पक्षांचं नेतृत्व करत होतो. त्यावेळी 58 आमदार निवडून आले होते. त्यावेळी 6 सोडले तर सगळे मला सोडून गेले होते. मी त्या 58 चा विरोधी पक्षनेता होते, मी 5 लोकांचा नेता झालो. 5 लोकांना घेऊन मी पक्ष बांधायला महाराष्ट्रात बाहेर पडलो, माझा उद्देश होता की पक्ष वाढवयाचा होता. आज तितकीच संख्या आली. जे पक्ष सोडून गेले ते फरार झाले होते. 1986 नंतर पुन्हा पक्ष कसा उभा राहिल यासाठी माझा एककलमी कार्यक्रम असणार आहे.

)







