विक्रम गोखले म्हणाले, राष्ट्रवादीत फक्त एकाच नेत्याकडे 'व्हिजन', आणि तो म्हणजे...

विक्रम गोखले म्हणाले, राष्ट्रवादीत फक्त एकाच नेत्याकडे 'व्हिजन', आणि तो म्हणजे...

'मी मोदी भक्त नाही. मी राजकीय पक्षाशी सबंधित नाही. कोणाचा झेंडा मी घेतला नाही.'

  • Share this:

पुणे 5 जानेवारी : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत परखड मतं व्यक्त केलीत. गोखले हे सडेतोड वक्तव्य आणि विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या सुरू असलेल्या अनेक वादांवर त्यांनी मतं व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली. वीर सावरकर, शिवाजी महाराज, शरद पवार, सेन्सॉरशीप अशा अनेक विषयांवर त्यांनी मतं व्यक्त केलीय. ते म्हणाले, सरकार मान्य सेन्सॉरशीप योग्य आहे. पण वेब सिरीजमध्ये गैरफायदा घेतला जातोय. मात्र खासगी सेन्सॉरशीप नकोच, आम्हाला सिनेमा दाखवा आणि त्यानंतर तुम्ही तो प्रसिद्ध करा हा गाढवपणा आहे असं ते म्हणाले.

सर्व कलाकार एकत्र येतात हे स्वप्नवत वाटते, त्यांनी धाडस दाखवावं हे महत्त्वाचं मात्र तसे होत नाही. काही कलाकार असुरक्षित समजतात. देशात जात धर्म उपजत असून वाईट आणि घाण आहे. मी स्वतः कधीही हिंदू ब्राम्हण म्हणून घेत नाही. जो ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण. लोकांना शहाणे करुन सोडणे हे महत्त्वाचं, सामान्य माणसाला शहाणे करून सोडावं लागेल. कोलकात्यात ब्राम्हण संडास साफ करतात, विष्ठा गाडी चालवतात हेही लक्षात घ्या.

पुन्हा दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलले, अशी आहे नवी यादी

मी सावकार भक्त आहे, मी अभ्यास केला, ज्यांना सावरकर कळले नाही, जे ब्राम्हणांचा तिरस्कार करतात, ज्यांना समाजात किंमत नाही ते वाद निर्माण करत आहे. नेते पदासाठी वाद पेटते ठेवत आहेत.

सोनिया गांधी यांना सावरकर माहित नाही. त्यांना त्यांच्या वर बोलण्याचा अधिकार नाही, राहुल गांधी यांना पण अधिकार नाही, काही जण शिव्या देतात. सावरकर हे देव नाही तर माणूस होते, गांधी, सावरकर यांची चूक होऊ शकते हे लक्षात घ्या.

शरद पवारांना व्हिजन आहे. राष्ट्रवादीमध्ये एकमेव माणूस ज्याला व्हिजन आहे. मात्र त्यांना त्यांना जाणता राजा म्हणा, असं म्हणणार नाही असंही ते म्हणाले.

अमृता फडणवीसांचा नवा लूक, संक्रांतीच्या दिल्या खास शुभेच्छा

तर शिवाजी महाराज आणि मोदी यांची तुलना चुकीची आहे, राजे हे राजे आहेत. भाजपने अशा लोकांना लगाम घातला पाहिजे.

मी मोदी भक्त नाही. मी राजकीय पक्षाशी सबंधित नाही. कोणाचा झेंडा मी घेतला नाही. जनता राजा आहे. राजा कोणी नसतो, तो हळू हळू शिकतो, राजा एकटा चांगला असून योग्य नाही तर खालील प्रशासन बुद्धिमान असणे गरजेचे आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: January 15, 2020, 7:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading