Elec-widget

'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन'

'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन'

'गेली अनेक दशकं शरद पवार हेच राजकारणाचा केंद्र बिंदू आहेत. बाळासाहेब ठाकरे असो वा नरेंद मोदी पवार यांच्यावरच टीका केली जाते.'

  • Share this:

पुणे 20 सप्टेंबर : शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन आहेत अशी स्तुतिसमुनं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उधळलीत. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आव्हाड म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमचे अमिताभ बच्चन आहेत. वयाची 75 वर्षे उलटून गेल्यावरही ते ज्या उत्साहाने काम करत आहेत त्याची सगळ्याच तरुणाईला भुरळ पडली आहे.  प्रचंड ऊर्जा आणि ताकद असलेले ते नेते आहेत असंही ते म्हणाले. शरद पवारांनीही एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं की, अनेक जण म्हणतात मी म्हातारा झालोय पण मी अजुनही लढायला तयार आहे. मला अनेकांना घरी पाठवायचं आहे.

ते पुढे म्हणाले, मी शरद पवार यांचा वारकरी 35 वर्षे झाली मी पाहतोय आणि त्याआधी पासून शरद पवार हेच राजकारणाचा केंद्र बिंदू आहेत. बाळासाहेब ठाकरे असो वा नरेंद मोदी पवार यांच्यावरच टीका केली जाते.पंतप्रधान मोदी हे मंदी, शेती, बेरोजगारी यावर का बोलत नाहीत? त्यांना माहिती आहे ते अडचणीचे प्रश्न आहेत. त्यामुळे राष्ट्रवादावर टीका करून दिशाभूल केली जातेय.

सगळचं ठरलं तर 'युती'चं घोडं अडलं कुठे?

'भाजपला सत्तेवरून हाकला'

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना फैलावर घ्यायला सुरुवात केलीय. जे नेते सोडून गेले त्यांच्याच गावात जावून पवार कार्यकर्त्यांना भेटत आहे. 15-20 वर्ष जे पवारांसोबत होते असं निष्ठावान समजले जाणारे अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला प्रचंड मोठं खिंडार पडलंय. ही पडझड रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी शरद पवार राज्यांच्या झंझावती दौऱ्यावर आहेत. आज जालन्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी पक्ष सोडणाऱ्या चांगलाच दम भरला.

Loading...

पवार म्हणाले, पक्ष बदलणारे म्हणताय विकास करायचा म्हणून तिकडे चाललो, मग 15-15 वर्ष मंत्रिपद असून काय केलं. विकासाच्या नावावर पक्ष सोडणाऱ्यांनो थोडे दिवस थांबा, तुम्ही आणि मी आहोत. फक्त बटन दाबायची वेळ येऊ द्या, मग यांचा विकास कुठे पाठवायचा ते आपण ठरवू. कुठे पळापळ झाली तरी जालन्यातील राष्ट्रवादीचा कोणीही कुठे जाणार नाही याचा मला विश्वास आहे. असं त्यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस लातूरचा बालेकिल्ला राखणार? पाहा SPECIAL REPORT

जाताना नेते म्हणतात पवार माझ्या ह्रदयात आहेत. मी जर तुमच्या ह्रदयात आहो तर मग पक्ष का सोडून जात आहात असा सवाल त्यांनी केला. पवार यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, शहा उद्योगपतींचं कर्ज माफ करताहेत पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही अशी त्यांची भूमिका आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर अन्न-पाणी मिळते त्याच शेतकऱ्यांना हे लोक विसरतात. तुम्ही आम्ही एकदा ठरवलं तर भाजपला सत्तेवरून हाकलायला वेळ लागणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2019 05:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...