मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पंतप्रधान होणार का? शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर

पंतप्रधान होणार का? शरद पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर

शरद पवारांची पंतप्रधानपदावर प्रतिक्रिया

शरद पवारांची पंतप्रधानपदावर प्रतिक्रिया

लोकसभेच्या तयारीला सुरुवात झाली आहे, विरोधकांकडून पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये आहात का? या प्रश्नाला आता शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

पुणे, 23 मे : आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान याबाबत शरद पवार यांना विचारले असता आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे, विरोधकांना असं नेतृत्व हवं आहे की जे देशाचा विकास करेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

जागा वाटपवार प्रतिक्रिया

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. मी विरोधकांना सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी लोकसभेच्या जागा वाटपावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटपासंदर्भात मी काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीची एक बैठक बोलावली होती. त्यानंतर आता आपण सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून जागा वाटपावर चर्चा करू असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यात महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. याबाब बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, कोरोनामुळे अनेक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र या वर्षाअखेर निवडणुका होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली यावरून शरद पवार यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हा विरोधकांवर दबावाचा प्रयत्न असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Congress, NCP, Sharad Pawar