गुरूच झाला हैवान, पुण्याच्या मौलवीने अश्लिल फोटो काढून तरुणीवर केले लैंगिक अत्याचार

पुण्यात शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एका मौलवीने मुंबईत राहणाऱ्या एका तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2018 10:18 AM IST

गुरूच झाला हैवान, पुण्याच्या मौलवीने अश्लिल फोटो काढून तरुणीवर केले लैंगिक अत्याचार

वैभव सोनावणे, प्रतिनिधी

पुणे, 29 ऑगस्ट : पुण्यात शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एका मौलवीने मुंबईत राहणाऱ्या एका तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत राहणाऱ्या या तरूणीला पुण्यात उच्च शिक्षणासाठी मदत करतो असे या मौलवीने सांगितले होते. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ५० वर्षीय मौलवी युनुस हाशिम शेख याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी मुंबईची राहणारी आहे.

या प्रकरणातला मौलवी युनुस शेख हा मुंबईत या तरूणीच्या घराशेजारी नेहमी येत असे. त्याची या तरूणीशी ओळख झाली. पीडित तरूणीने या मौलवीला गुरु मानले होते. त्यानंतर या तरूणीला उच्च शिक्षणासाठी पुण्यात यायचे होते. त्यामुळे पुण्यात मुलीला वास्तव्य करण्यासाठी हॉस्टेल पाहा असे या मौलवीला तिच्या घरातल्यांनी सांगितले.

हॉस्टेल उपलब्ध नसल्याने पुण्यातील हडपसरमध्ये राहता येईल असे या मौलवीने सांगितले. मौलवीने सांगितल्यावर पीडित तरूणी हडपसरमध्ये राहू लागली. ही पीडित तरूणी मौलवीच्या घरी राहात होती. मौलवी, त्याची पत्नी आणि ही मुलगी असे काही दिवस एकत्र राहात होते. एके दिवशी युनुस शेखने त्याची पत्नी बाहेर गेल्यावर या तरूणीचे अश्लील फोटो काढले आणि घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या आई वडिलांना ठार करेन अशीही धमकी दिली.

मौलवीने दिलेल्या धमकीमुळे ही तरूणी शांत राहिली. मात्र मुंबईत परतल्यावर या तरूणीने आपल्या आई-वडिलांना सगळा प्रकार सांगितला. या तक्रारीची दखल घेत मौलवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आता कोणावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा याचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे.

Loading...

VIDEO : तरुणाच्या हत्येची थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 10:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...