Home /News /pune /

पुण्याच्या बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्सची व्यथा, PM मोदींना लिहिलं पत्र

पुण्याच्या बुधवार पेठेतील सेक्स वर्कर्सची व्यथा, PM मोदींना लिहिलं पत्र

पुण्यातील बुधवारी पेठेतील सेक्स वर्कर्सने आपल्या व्यथा मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे.

    पुणे, 14 जून : जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेकांचं आयुष्य बदलून गेलं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भारतातही लॉकडाऊन करण्यात आला. मात्र या लॉकडाऊनमुळे गरीबांच्या रोजीरोटीवर कुऱ्हाड कोसळली. स्थलांतरीत मजूरांपासून ते वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांपर्यंत अनेकांना दोन वेळेच्या अन्नाचा प्रश्न भेडसावत आहे. अशातच रेड लाईट एरिया अशी ओळख असणाऱ्या पुण्यातील बुधवारी पेठेतील सेक्स वर्कर्सने आपल्या व्यथा मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. पुण्यातील विविध पेठा कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरल्या असल्या तरीही बुधवार पेठेत मात्र कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मात्र शहरात असणाऱ्या लॉकडाऊनच्या स्थितीमुळे येथील सेक्स वर्कर्सवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबतच या महिलांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आर्थिक साहाय्याची मागणी केली आहे. याबाबत 'TV9 मराठी'ने वृत्त दिलं आहे. बुधवार पेठेतील महिलांना विविध सामाजिक संस्थांकडून मदत केली जात आहे. मात्र सरकारने अद्याप कोणतीही मदत केली नाही, असं या महिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्हाला मासिक 3 ते 4 हजार रूपयांची मदत करावी, अशी मागणी करणारं पत्र या महिलांनी नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. याबाबत आता सरकारकडून काही निर्णय घेण्यात येतो का, हे पाहावं लागेल. पुण्यात काय आहे कोरोनाची स्थिती? 13 जून रोजीची आकडेवारी - दिवसभरात 254 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात 163 रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात 14 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. - 298 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 47 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 9336. (डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-8690 आणि ससून 646) - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2810. - एकूण मृत्यू -439. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 6087. - शनिवारी केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 2476 संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pune news

    पुढील बातम्या