SEX TOYS कडे पुणेकरांचा वाढता कल; कोट्यवधींचा ऑनलाइन बाजार

SEX TOYS कडे पुणेकरांचा वाढता कल; कोट्यवधींचा ऑनलाइन बाजार

या वर्षात पुण्यात sex toys ची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचं उघड झालं आहे.

  • Share this:

पुणे, 03 डिसेंबर : कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) सेक्स टॉईजकडे (SEX TOYS) लोकांचा कल वाढला आहे. एकिकडे  सरकारनं पॉर्न साइटवर बंदी घातली आहे, तर दुसरीकडे SEX TOYS ची ऑनलाइन विक्री जोमात सुरू आहे. सेक्स टॉईजसारख्या साहित्याचं उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचं सर्वेक्षण केलं. भारतातील सेक्स टॉईजचा व्यवसाय साडेआठशे कोटींच्या पुढे असल्याचं सांगितलं जातं आहे.

पुण्यामध्ये तर सेक्स टॉईज वापरणाऱ्यांची संख्या इतक्या प्रमाणात वाढली आहे, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. 65 टक्क्यांपेक्षा अधिक पुरुष सेक्स टॉयज खरेदी करत आहेत. तर महिलांमध्येही याचं प्रमाण लक्षणीय आहे. वर्षाला कोट्यवधींचा बाजार होत असल्याचं समोर आलं आहे.

यामध्ये सेक्स डॉल, तेल, औषधं यांचा समावेश आहे. चीनमधून या वस्तू आयात केल्या जात आहेत आणि दिल्ली, उत्तर भारतातून हा माल ग्राहकांना पुरवला जातो आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये याची विक्री होताना दिसते आहे. कुरिअरमार्फत माल घरपोच दिला जातो आहे.

हे वाचा - आधी लावला VIAGRA चा शोध, नंतर Pfizer ने बनवली कोरोना लस

भारतात अशा वस्तूंची जाहिरात करण्यावर बंदी आहे. मात्र तरी वेबसाईटच्या माध्यमातून अशा वस्तूंची जाहीरात केली जाते आहे. यासाठी फेसबुक, ट्विटर अशा सोशल मीडियाचा वापर केला जातो आहे. पॉर्न कंटेट पाहणाऱ्यांच्या मोबाइलवर सेक्स टॉयजसंबंधी थेट मेसेज पाठवले जात आहेत.  त्यात संबंधित वेबसाईट्सह संपर्कासाठी मोबाइल नंबरही दिला जातो आहे.

लोकमतच्या वृत्तानुसार सायबर सायकोलॉजिस्ट आणि सायबर गुन्हे तज्ज्ञ रोहन न्यायाधीश यांनी सांगितलं, "लॉकडाऊननंतर सेक्स टॉईजच्या मागणीत 65 टक्के वाढ झाली आहे. जवळपास 5 लाख प्रोडक्ट्स विकले गेले आहेत. या साहित्याची जाहिरात करणं, प्रदर्शन मांडणं, अश्लीलतता पसरवणं यासाठी कारवाई केली जाऊ शकते."

हे वाचा - UN चा ऐतिहासिक निर्णय! ड्रग्जच्या यादीतून Cannabis हटवले; 27 देशांचा पाठिंबा

संपर्क साधण्याचा मार्ग पूर्णपणे वैयक्तिक असल्यानं अशा वस्तू  सहजरित्या उपलब्ध होत आहे आणि त्यावर पोलीस किंवा कोणत्याच प्रशासनाचं नियंत्रणही नाही. शिवाय या खासगी वस्तू असल्यानं त्यावर कितपत कारवाई होईल हेदेखील सांगू शकत नाही. घरात सेक्स टॉईज ठेवणं किंवा वैयक्तिरित्या वापरणं हे खासगी आहे, तोपर्यंत हा गुन्हा ठरत नाही. मात्र असे साहित्य मागवणे, त्याची विक्री करणं हा गुन्हा आहे. यामध्ये शिक्षेचीही तरतूद आहे.

लोकमतच्या वृत्तानुसार पुणे शहर पोलीसच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त  बच्चनसिंह यांनी सांगितलं, "अश्लीलता प्रदर्शित करणारी पुस्तकं, साहित्य, मजकूर, व्हिडीओ यांची जाहिरात आणि विक्री केली जात असेल तर त्यावर कलम 292 नुसार कारवाई केली जाते. याच कलमानुसार सेक्स टॉईजच्या ऑनलाईन विक्रीवरही कारवाई करता येते. मात्र सेक्स टॉईजबाबत स्पष्ट कायदा किंवा नियम लागू आहे की नाही हे पाहावं लागेल"

Published by: Priya Lad
First published: December 3, 2020, 9:37 PM IST

ताज्या बातम्या