Home /News /pune /

पर्यटनाच्या नावाखाली 'सेक्स रॅकेट' चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुण्यात सापळा रचून दोघांना अटक

पर्यटनाच्या नावाखाली 'सेक्स रॅकेट' चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुण्यात सापळा रचून दोघांना अटक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Sex Racket Exposed in Pune: पुण्यातील कोरेगाव आणि विमानतळ परिसरात पर्यटन व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं पर्दाफाश केला आहे.

    पुणे, 02 मार्च: काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (High profile sex racket) करण्यात आला होता. पोलिसांनी पिंपरीतील एका लॉजवर छापेमारी (Raid) करत छत्तीसगडच्या एका अभिनेत्रीसह अन्य दोन तरुणींची सुटका करण्यात आली होती. तसेच दोन परप्रांतीय दलालांना अटक केली होती. ही घटना ताजी असताना पुण्यातील कोरेगाव आणि विमानतळ परिसरात पर्यटन व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटचा ( sex racket run in the name of tourism) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक (2 Accused arrested) केली असून दोन मुलींची सुटका केली आहे. कुलदिप प्रसाद मोहनप्रसाद महतो (वय 26, रा. डोंगरीपाडा, ठाणे, मूळ रा. झारखंड) आणि जयशंकर प्रसाद रमेश साव (वय 20, रा. जकॉब सर्कल मुंबई, मूळ रा. झारखंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी पर्यटनाचा व्यवसाय करणाऱ्या कारचा वापर करत शहरातील विविध भागात वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवण्याचं काम करत होते. याबाबतची गुप्त माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. हेही वाचा-मिटींगसाठी बोलावून केला विश्वासघात; नराधमाने महिला वकिलाला गुंगीचं औषध दिलं अन् त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सर्वप्रथम आरोपींचे मोबाइल नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला. बनावट ग्राहक बनून त्यांच्याकडे मुलीची मागणी केली. यानंतर आरोपीनं त्यांना विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम बूक करण्यास सांगितली. त्यानुसार ग्राहकानं रूम बूक केली. रूम बूक केल्यानंतर सोमवारी सायंकाळी 'टूरिस्ट व्हेईकल' लिहिलेली एक कार त्याठिकाणी आली. हेही वाचा-पिंपरीत हाय प्रोफाईल SEX रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीकडून सुरू होता वेश्याव्यवसाय यावेळी आरोपी महतो आणि साव दोघंही कारमधून खाली उतरले. पण आधीच साध्या वेशात सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. तसेच दोन्ही तरुणींची सुटका केली. महतो आणि साव यांच्याकडे चौकशी केली असता "टुरिस्ट व्हेईकल' चालवत असल्याचं भासवून परराज्यातील महिला, तरुणींकडून जबरदस्तीने वेश्‍या व्यवसाय करून घेत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Sex racket

    पुढील बातम्या