पुणे, 11 ऑक्टोबर: पुणे-सोलापूर महामार्गालगत एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला (Sex racket exposed at lodge in Pune) आहे. सायबर पोलीस आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी लॉजवर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका दलालाला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. तसेच लॉजचा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायात अडकलेल्या सहा तरुणींची सुटका (6 young women Released) केली आहे.
रवीश शेट्टी असं अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मूळचा कर्नाटकातील उडपी येथील रहिवासी आहे. आरोपी शेट्टी हा खडकी-दौंड येथील सुर्या लॉजवर सहा तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. गेल्या बऱ्याच दिवसांपासून याठिकाणी हा वेश्याव्यवसाय सुरू होता. अत्यंत गुप्तता पाळून हा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे बरेच दिवस याची खबर पोलिसांना देखील नव्हती.
हेही वाचा-'खास तुझ्यासाठी देवानं मला पाठवलंय', पुजाऱ्याचे विवाहितेवर 6 वर्षे अत्याचार
दरम्यान, सोलापूर-पुणे महामार्गालगत दौंड तालुक्यातील खडकी येथील सुर्या लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती एका लोकल पत्रकाराने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिली होती. यानंतर देशमुख यांनी सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार संबंधित पथकाने यवत पोलिसांच्या मदतीने सुर्या लॉजवर छापा टाकला आहे.
हेही वाचा-जास्तीचं भाडं नाकारल्याने उगवला सूड; मुंबईतील तरुणीसोबत उबेर एजंटचं भयंकर कृत्य
यावेळी कारवाई करत पोलिसांनी लॉजवर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या रवीश शेट्टीला अटक केली आहे. तसेच त्याचे अन्य काही सहकारी आणि लॉजच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या सहा तरुणींची सुटका केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune