Home /News /pune /

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका असताना सीरमने बंद केली लस निर्मिती, काय आहे यामागचं नेमकं कारण? वाचा

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका असताना सीरमने बंद केली लस निर्मिती, काय आहे यामागचं नेमकं कारण? वाचा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्डचे 100 कोटींहून अधिक डोसेस (Dose) आतापर्यंत तयार केले असून, गरीब देशांना कोविड-19 प्रतिबंधक लशींचा पुरवठा करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

    पुणे, 23 एप्रिल : सध्या चीन, अमेरिका आदी देशांमध्ये कोरोना (Corona) महामारीचा उद्रेक पुन्हा पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे बहुतांश राज्यांनी निर्बंध हटवले आहेत; मात्र गेल्या काही दिवसांत दिल्ली, हरियाणासह अन्य काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यातच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) या जगातल्या सर्वांत मोठ्या लसनिर्मात्या कंपनीने अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड (Covishield) या कोविड-19 प्रतिबंधक लशीचं (Vaccine) उत्पादन थांबवलं आहे. कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांनी शुक्रवारी (22 एप्रिल) ही माहिती दिली. सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्डचे 100 कोटींहून अधिक डोसेस (Dose) आतापर्यंत तयार केले असून, गरीब देशांना कोविड-19 प्रतिबंधक लशींचा पुरवठा करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात आता मोठ्या प्रमाणात कोविड-19 प्रतिबंधक लशी उपलब्ध आहेत. जगाची फार्मसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतानं गेल्या वर्षी कोरोनाशी लढण्यासाठी लशींची निर्यात मर्यादित ठेवली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा लशींची निर्यात सुरू करण्यात आली. वाचा : लो ग्रेड ताप भरतो तेव्हा अऩेकांना कळतही नाही; अशी लक्षणं दिसत असतील तर सावध व्हा स्टॉकमध्ये आहेत 20 कोटी डोस 'सीरम कंपनीकडे कोविड -19 प्रतिबंधक लशीचे 20 कोटी डोसेस स्टॉकमध्ये आहेत. आम्ही डिसेंबरमध्ये उत्पादन थांबवलं होतं. गरजूंना मोफत लस देण्याची तयारीही मी दर्शवली होती. या स्टॉकचं काय करावं हे मला समजत नव्हते. त्यामुळे उत्पादन थांबवण्याच्या सूचना मला द्याव्या लागल्या,' असं 'सिरम'चे सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी सांगितलं. भारताच्या औषध नियामक यंत्रणेने कोविशिल्डचा वापर उत्पादनानंतर 9 महिन्यांपर्यंतच करण्याचा सल्ला दिला आहे. 'केवळ कोविशिल्डचे उत्पादन थांबवलं आहे,' अशी माहिती 'एसआयआय'च्या प्रवक्त्याने दिली आहे. विशेष म्हणजे नोव्हावॅक्स (Novavax) या अमेरिकी फार्मा कंपनीच्या कोवोव्हॅक्स (Kovovax) या लशीचं उत्पादनदेखील सीरम कंपनी करते. वाचा : तुम्हालाही होतोय हेयर फॉलचा प्रॉब्लेम? या 5 गोष्टी टाळाच मागणी आणि पुरवठ्यातली तफावत वाढती गेल्या वर्षाच्या मध्यापासून कोविड-19 प्रतिबंधक लशींचं उत्पादन मागणीपेक्षा जास्त झालं आहे आणि ही तफावत वाढत आहे. तरीही आजही कोट्यवधी नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लस मिळालेली नाही. यातले बहुतांश नागरिक विकसनशील देशांमधले आहेत. भारत हा जगातला तिसरा सर्वाधिक कोविड-19 (Covid-19) प्रभावित देश असून, आतापर्यंत भारतात 187 कोटी डोसेस देण्यात आले आहेत. भारतात कोविड -19 प्रतिबंधक लशींचे दोन डोसेस 12 वर्षं आणि त्यावरच्या वयोगटातल्या व्यक्तींना दिले जात आहेत. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. परंतु, एप्रिलच्या अखेरीस रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. शनिवारी (23 एप्रिल) देशात 2500 हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Pune

    पुढील बातम्या