अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली.. छातीत इन्फेक्शन, पुण्यात केले अॅडमिट

अण्णांच्या छातीत इन्फेक्शन झाले आहे. त्यांची प्रकृती स्थीर असून चिंतेचे कारण नसल्याचे वेदांता हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 06:25 PM IST

अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली.. छातीत इन्फेक्शन, पुण्यात केले अॅडमिट

पुणे,3 सप्टेंबर:ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मंगळवारी शिरूर येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. अण्णांना सर्दी, खोकला आणि अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अण्णांच्या छातीत इन्फेक्शन झाले आहे. त्यांची प्रकृती स्थीर असून चिंतेचे कारण नसल्याचे वेदांता हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले आहे.

अण्णांना सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना राळेगण सिद्धि येथून शिरूर येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. डॉक्टरांच्या एक पथकाने अण्णांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेतले. डॉक्टरांनी अण्णांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

सर्दीमुळे छातीत इन्फेक्शन...

सर्दीमुळे अण्णांना छातीत इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे त्यांना खोकला आणि अशक्तपणा आला आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थीर असून चिंतेचे कारण नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

या आधी नोबेल हॉस्पिटलमध्ये केले होते दाखल..

Loading...

दरम्यान, गेल्या फेब्रुवारीमध्ये अण्णा हजारे यांना अशक्तपणा आल्याने त्यांना अहमदनगरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 30 जानेवारीपासून अण्णा हजारेंनी सात दिवस सरकारविरोधात लोकपालसह विविध मागण्यांसाठी उपोषण केले होते. त्यामुळे त्यांचे वजनही घटले होते. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जास्त अशक्तपणा आल्यामुळे त्यांना नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार आणि तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून दोन दिवस उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा सोडण्यात आले होते.

VIDEO :...त्यात वावगं काय? मुनगंटीवार यांचा रोहित पवारांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...