Home /News /pune /

पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजच्या वेलकम पार्टीत 'दे दना दन' राडा; ज्युनिअर्संना विटांनी मारहाण

पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजच्या वेलकम पार्टीत 'दे दना दन' राडा; ज्युनिअर्संना विटांनी मारहाण

Crime in Pune: पुण्यातील लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथील एका प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये (Engineering college) सिनिअर आणि ज्युनिअरमध्ये तुफान हाणामारी (senior student beat junior) झाल्याची घटना समोर आली आहे.

    पुणे, 13 डिसेंबर: पुण्यातील लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथील एका प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये (Engineering college) सिनिअर आणि ज्युनिअरमध्ये तुफान हाणामारी (senior student beat junior) झाल्याची घटना समोर आली आहे.  फ्रेशर्स पार्टीत झालेल्या वादातून (Dispute at freshers party) काही सिनिअर विद्यार्थ्यांनी दोन ज्युनिअर विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी हातातील कडं आणि विटांनी मारहाण करत ज्युनिअर्संना जखमी केलं आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर याठिकाणी एक प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर रोजी पुण्यातील मुंढवा परिसरातील एका बड्या हॉटेलमध्ये कॉलेजच्या फ्रेशर्ससाठी वेलकम पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बारा आरोपी विद्यार्थी आणि दोघा तक्रारदार विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणातून खुन्नस दिल्याने बाचाबाची झाली होती. हेही वाचा-नाशिकमध्ये भरदिवसा तरुणावर कोयत्याने सपासप वार, अंगावर शहारे आणणारा LIVE VIDEO त्यामुळे पार्टीमध्येच दोन्ही गट आपसात भिडले होते. आसपासच्या विद्यार्थ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला होता. पण आरोपी विद्यार्थ्यांनी हा राग मनात धरून घटनेच्या दिवशीच शुक्रवारी दुपारी साडेचार ते साडेसहाच्या सुमारास संबंधित दोन ज्युनिअर तरुणांना गाठून मारहाण केली आहे. आरोपींनी हातातील कडं आणि विटांनी मारहाण करत ज्युनिअर्संना जखमी केलं आहे. या मारहाणीत जखमी झालेले दोन्ही ज्युनिअर तरुण हे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. तर आरोपी तरुण हे तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. हेही वाचा-Bhandara: भरलग्नात दोन मित्र आपसात भिडले; सपासप वार करत एकाची हत्या, कारण समोर घटनेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी संबंधित दोन्ही तरुणांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित बारा जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. जखमी विद्यार्थ्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या