Arun Nigavekar: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरूण निगवेकर यांचे पुण्यात निधन, शिक्षण क्षेत्रातील तारा निखळला

Arun Nigavekar: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरूण निगवेकर यांचे पुण्यात निधन, शिक्षण क्षेत्रातील तारा निखळला

Arun Nigvekar passes away: ज्येष्ठ शिक्षकतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांचे पुण्यात निधन झाले आहे.

  • Share this:

पुणे, 23 एप्रिल: भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आधुनिकतेचा प्रवाह आणणारे महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर (Dr. Arun Nigavekar) यांचे निधन झाले आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशाच्या शिक्षणाला बहुमाध्यमांच्या साह्याने पुढे नेण्यासाठी सतत झटणारे एक कुशाग्र, निष्णात पदार्थ वैज्ञानिक अशी त्यांची ओळख होती.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद, शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राचे संचालक पद, विद्यापीठ अनुदान मंडळाचं सदस्य पद, उपाध्यक्ष आणि अध्यक्षपद, "नॅक"चे संस्थापक संचालक ही पदं त्यांनी भूषविली आहेत.

सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे, तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या शिक्षण विषयक अनेक समित्यांचे ते सल्लागार होते. देशातील पहिली शिक्षणास वाहिलेली "व्यास" वाहिनी सुरू करण्यात आणि आभासी शिक्षण प्रकल्पास गती देत, पदवी पर्यंतची सर्व विषयांची राष्ट्रीय ई कंटेट निर्मिती सुरू करण्यात त्यांचं महत्वाचं योगदान होतं.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर बहूआयामी होते. विनयशील स्वभावाच्या डॉ. निगवेकर यांनी पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ, कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही शिक्षण क्षेत्रात विद्यार्थीभिमुख असे काम केले. भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण प्रवाह आणण्यासाठी त्यांनी 'नॅक' सारख्या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केला. देशातील संगणक तंत्रज्ञान आणि नागरी सेवा क्षेत्रातील शिक्षणाच्या दर्जात्मक सुधारणेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत. भारतातील उच्च शिक्षणणाला जागतिक आयाम देणारा महाराष्ट्रपुत्र आपण डॉ. निगवेकर यांच्या निधनामुळे गमावला आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरूण निगवेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

First published: April 23, 2021, 10:47 PM IST
Tags: pune

ताज्या बातम्या