• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • भाजप-राष्ट्रवादीची पोस्टरबाजी, सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण

भाजप-राष्ट्रवादीची पोस्टरबाजी, सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला 61 किलोंचा मोदक अर्पण

पुण्यात गेल्याच आठवड्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार दोन्ही पक्षांनी जोरदार पोस्टरबाजी केल्याचं बघायला मिळालं

  • Share this:
पुणे, 26 जुलै : शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस (dagadusheth halwai ganapati temple pune) तब्बल 61 किलोचा माव्याचा मोदक अर्पण करण्यात आला. शिवसेना (shivsena) नेत्या आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे (neelam gorhe) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा 61 किलोंचा मोदक गणरायाला अर्पण करण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेनं दगडूशेठ गणपतीची महाआरतीही घातली. यावेळी डॉ. नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या,   “उद्धव ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य मिळावे, यासाठी बाप्पाला हा मोदक अर्पण करण्यात आलाय. तसंच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं आहे परंतु, सर्व जग, महाराष्ट्र, पुणे मुंबई अशा सर्वत्र विनाश करणार्‍या कोरोना महामारी संकटातून जातंय, त्यातून आपण सर्वांना मुक्ती मिळो तसंच आताच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावलेल्यांच्या आत्म्यास शांती मिळो या सर्व आपत्तीग्रस्तांचे योग्य पुनर्वसन व्हावे व सेवा करण्याचे बळ ठाकरे सरकारला मिळावे तसंच कोरोना परिस्थितीतून मार्ग मिळावा, " अशी प्रार्थनाही या प्रसंगी सेना पदाधिकाऱ्यांच्यावतीने बाप्पाकडे केली. अंगारकी चतुर्थी! सिद्धिविनायकाचं प्रत्यक्ष दर्शन नाही तरी कसा पाहाल कार्य़क्रम... विशेष म्हणजे, पुण्यात गेल्याच आठवड्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार दोन्ही पक्षांनी जोरदार पोस्टरबाजी केल्याचं बघायला मिळालं. भाजपने फडणवीस यांना नव्या पुण्याचे शिल्पकार म्हणून गावभर पोस्टर्स छळकावली तर त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीने अजित पवारांना पुण्याचे विकास पुरूषाची उपमा देऊन टाकत भाजपला प्रत्युत्तर दिलं. थोडक्यात आगामी पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन प्रमुख पक्षांनी आपआपल्या नेत्यांच्या वाढदिवसाआडून हे असं शक्तीप्रदर्शन केल्यामुळे शिवसेना देखील या स्पर्धेत उतरणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं होतं. सेल्फीच्या वेडानं विद्यार्थ्यांचा घेतला जीव; एकाने दुसऱ्यासाठी मृत्यूला कवटाळलं उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा करण्याची तयारी चालवली होती. पण अशातच पश्चिम महाराष्ट्रासह कोकणावर मुसळधार पावसाच्या रुपाने महापुराचे संकट ओढवल्याने मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे फर्मानच शिवसैनिकांना काढले.  म्हणून मग शिवसैनिकांनी आपल्या मुख्यमंञ्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी नवसाचा गणपती आणि तमाम गणेशभक्तांचा लाडका बाप्पा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात महाआरती करून 61 किलोचा मोदक अर्पण करून मुख्यमंञ्यांना वाढदिवस साजरा केला.
Published by:sachin Salve
First published: