जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / Koyta Gang Pune : पुण्यात पोलिसांनी उतरवला कोयता गँगचा माज, पाहा VIDEO

Koyta Gang Pune : पुण्यात पोलिसांनी उतरवला कोयता गँगचा माज, पाहा VIDEO

कोयता गँगची धिंड

कोयता गँगची धिंड

पुणे पोलिसांनी कोयता गँगचा चांगलाच माज उतरवला आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 6 जुलै : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. या गुन्हेगारांची दहशत मोडून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांची धिंड काढली. पुणे पोलिसांनी कोयता गँगची चक्क गरवारे कॉलेजमधूनच या कोयता गँगची धिंड काढली. या गुंडांनी काही दिवसांपूर्वी याच कॉलेज परिसरात कोयता नाचवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच डेक्कन पोलिसांनी त्याच कॉलेजात या 9 गुंडांची ही अशी वरात काढून मुलांमधील त्यांची दहशत नाहिशी करण्याचा प्रयत्न केला आहे. कोयता गँगला यापुढे अशाच पद्धतीने पोलिसी खाक्या दाखवणार असल्याचा इशाराही पुणे पोलिसांनी दिला आहे.

जाहिरात

गेल्या आठवड्यातही पोलिसांनी मोडला होता माज -  गेल्या आठवड्यातही पुणे शहरातील सहकारनगर भागात गाड्यांची तोडफोड करणारा कोयता टोळी प्रमुखांची पोलिसांनी धिंड काढली होती. पुण्यातील अरणेश्वर भागात दोन दिवसांपुर्वी कोयता टोळीच्या दोन गटाने 15 गाड्यांची तोडफोड केली होती. या तोडफोड प्रकरणी आरोपींची सहकारनगर पोलिसांनी धिंड काढली. आरोपी जठाळ्या उर्फ राजाभाऊ लक्ष्मण उमाप आणि त्याच्या 11 साथीदारांनी पुण्यातील सहकार नगर परिसरात असलेल्या आरणेश्वरमध्ये तोडफोड केली होती. यानंतर सहकार नगरमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर वाहनांच्या तोडफोडीत झाले होते. त्यामुळे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर तोडफोड प्रकरणात पोलिसांनी तब्बल 32 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात