मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणे ग्रामीण भागात जमावबंदी लागू, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पुणे ग्रामीण भागात जमावबंदी लागू, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पुणे ग्रामीण भागात जमावबंदी कलम 144 लागू करण्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केली आहे.

पुणे ग्रामीण भागात जमावबंदी कलम 144 लागू करण्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केली आहे.

पुणे ग्रामीण भागात जमावबंदी कलम 144 लागू करण्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केली आहे.

पुणे, 14 नोव्हेंबर : त्रिपुरामध्ये कथित हिंसाचार प्रकरणाचे (, tripura violence) पडसाद महाराष्ट्रात उमटले. मालेगाव (malegaon), नांदेड (nanded) आणि अमरावतीमध्ये (amravati) पुकारण्यात आलेल्या बंदला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिले. याचे लोण इतर जिल्ह्यात पोहोचू नये म्हणून पुणे (pune) जिल्ह्यात कलम 144 लागू (Section 144 applicable) करण्यात आले आहे. तसंच जळगावमध्येही कडक बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण भागात जमावबंदी कलम 144 लागू करण्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केली आहे. अमरावती, नांदेड, मालेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाची खबरदारी घेतली आहे. पुणे एसपींनी 144 चा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील ग्रामीण भागात जमाव गोळा करण्यास मनाई असणार आहे.

वृद्धेनं कोट्यवधीची संपत्ती केली रिक्षाचालकाच्या नावावर, कारण वाचून पाणवतील डोळे

अमरावतीत कलम 144 लागू

दरम्यान, अमरावती शहरासह संवेदनशील तालुक्यात कलम 144 जिल्हा प्रशासनाने लागू करण्यात आले आहे. त्या ठिकाणाची इंटरनेट सुविधा सुद्धा बंद  करण्यात आली आहे.  सध्या सर्व काही शांततेत आहे. सर्व नागरिकांनी घराच्या बाहेर न पडता कर्फ्यूचे पालन करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिथीलता देण्यात येईल, असे एडीजी राजेंश सिंग म्हणाले.

जळगावात कडक बंदोबस्त

तर दुसरीकडे, राज्यातील हिंसाचाराच्या घटनेनंतर जळगाव पोलीस सतर्क झाले आहे. राज्यातील हिंसाचाराच्या घटनेनंतर जळगाव येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी विशेष शांतता समितीची बैठक घेतली. शहरासह जिल्ह्यातील शांतता अबाधित राहावी यासाठी घेण्यात बैठक घेतली होती. जिल्ह्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी  3300 पोलीस, एसआरपीएफच्या तुकडी 8 आरसीपी पथक तैनात करण्यात आले आहे.  जळगाव शहरात रथोत्सव सुरू असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतला आहे.

एका रात्रीचे 25 हजार; टूरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तरुणींचा भांडाफोड

आमदार, महापौर, उपमहापौर, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह सर्वधर्मीय शांतता समितीचे सदस्य व नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही बैठक घेतली असून जिल्‍ह्यात शांतता अबाधित राहावी यासाठी 3300 पोलीस एसआरपी एफची तुकडी, 8 आरसीपी पथक तैनात करण्यात आले आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी याप्रसंगी केले आहे. दरम्यान, अफवा पसरणाऱ्यांवर  कठोर कारवाईचा इशाराही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

First published: