Home /News /pune /

Pune: बिर्याणी आणायला गेलेल्या मित्रांसोबत घडलं विपरीत; भलत्याच कारणातून कोयत्यानं केले वार

Pune: बिर्याणी आणायला गेलेल्या मित्रांसोबत घडलं विपरीत; भलत्याच कारणातून कोयत्यानं केले वार

Crime in Pune: पुण्यातील कोंढवा (Kondhawa) परिसरात बिर्याणी (Biryani) आणायला गेलेल्या दोन तरुणांवर कोयत्यानं हल्ला (Scythe Attack) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    पुणे, 25 जुलै: पुण्यातील कोंढवा (Kondhawa) परिसरात बिर्याणी (Biryani) आणायला गेलेल्या दोन तरुणांवर कोयत्यानं हल्ला (Scythe Attack) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  खर्चाला पैसे देण्यास नकार दिल्यानं (Not giving money) एका आरोपीनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं दोघां मित्रांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत बिर्याणी आणायला गेलेले दोघं मित्र जखमी (Injured) झाले आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक (Accused arrest) केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शुभम रामभाऊ टिकोळे असं अटक केलेल्या 25 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील कोंढवा खुर्द परिसरात वास्तव्याला आहे. याप्रकरणी गणेश घुगे (वय-21) या तरुणानं फिर्याद दाखल केली आहे. सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, फिर्यादी गणेश घुगे हा शनिवारी रात्री आपला मित्र संतोष परदेशी याच्यासोबत बिर्याणी आणण्यासाठी कोंढवा परिसरात गेला होता. दरम्यान त्याठिकाणी असलेल्या आरोपी शुभमने दोघांकडे खर्चासाठी पैसे मागितले. हेही वाचा-दलित बापलेकासोबत जमावाचं अमानुष कृत्य; बेदम मारहाण करत हात-पाय मोडले अन्... पण दोघांनी आरोपीला पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या शुभमने संतोषला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे फिर्यादी गणेश भांडणं सोडवण्यासाठी मध्ये पडला. यामुळे शुभमने गणेशवर कोयत्यानं वार करत गंभीर जखमी केले. आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्यानं रागाच्या भरात संतोषवरही कोयत्यानं हल्ला केला. हेही वाचा-क्रिकेट खेळताना घडलं अघटित; दोन तरुणांचा मॅचदरम्यान मृत्यू, कुटुंबाला बसला धक्का कोयत्यान वार केल्यामुळे संतोषच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. या घटना घडल्यानंतर गणेश घुगे आणि त्याचा मित्र संतोष परदेशी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी शुभम टिकोळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेत, तातडीनं घटनास्थळी जाऊन आरोपी शुभमला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Attack, Crime news, Pune

    पुढील बातम्या