Home /News /pune /

अनिल देशमुखांवरील कारवाईवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची दिली खोचक प्रतिक्रिया

अनिल देशमुखांवरील कारवाईवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची दिली खोचक प्रतिक्रिया

राज्यातील शाळा आणि महाविद्यालये 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापुढचं धोरण उपमुख्यमंत्री जाहीर करतील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

    पुणे, 25 जून:  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या (Second Wave) पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कोरोना रुग्णांची आकडेवारी (Corona Cases) कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा (Third wave) धोका लक्षात घेऊन काही उपाययोजना सरकार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरील ईडीनं टाकलेल्या छाप्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील शाळा आणि महाविद्यालये  (Schools and collages) 15 जुलैपर्यंत (15 July) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यापुढचं धोरण उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) जाहीर करतील, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे. अनिल देशमुखांवरील कारवाईवर प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ईडीनं केलेल्या छापेमारीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आपण फारसं बोलू इच्छित नाही, पण सध्या चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात असल्याचं ते म्हणाले. सध्या कोरोनावर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असून राजकीय डावपेचांसाठी ही वेळ योग्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. लसीकरणाला गती मात्र तिसऱ्या लाटेची भीती राज्यात लसीकरणाला आता गती मिळाली असून लसी उपलब्ध होण्याचं प्रमाण हळूहळू वाढत असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. मात्र तरीही डेल्टा प्लस व्हायरस आणि कोरोनाची तिसरी लाट यांची एकत्रित भीती असल्यामुळे काही निर्बंध कायम राहतील, याचे संकेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. विशेषतः लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्याबाबतचा निर्णय हा सांगोपांग विचार करूनच घेतला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गर्दीची चिंता कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्यानंतर काही जिल्ह्यांना दिलासा मिळायला सुरुवात झाली असली तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत असल्याचं दिसून येत आहे. ही चिंतेची बाब असून असे प्रकार सुरु राहिले, तर ते तिसऱ्या लाटेला दिलेलं एक प्रकारचं आमंत्रणच ठरेल, असं वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. अनेक नागरिक पावसाळी पर्यटनासाठी लहान मुलांसह बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळी गर्दी होत असून ही चिंतेची बाब असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शासनाने दिलेली प्रवासाची मुभा ही आवश्यक कामांसाठी आहे. सरसकट सर्वांनी बाहेर पडून गर्दी करू नये, अशं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे. हे वाचा -मोठी बातमी: अनिल देशमुखांच्या घराला केंद्रीय पथकाचा घेराव भाजपच्या ठरावाचा समाचार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या लेटरबॉम्बसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, असा प्रस्ताव गुरुवारी भाजपच्या कार्यकारिणीत मांडण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी असे आरोप करण्याची ही योग्य वेळ नाही, असं म्हटलंय. कुणी मागणी केली म्हणून सीबीआय चौकशी होत नसते, असं सांगत त्यांनी सीबीआय चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारचीच परवानगी घ्यावी लागेल, याकडंही लक्ष वेधलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, School

    पुढील बातम्या