पुणेकरांनो सावधान! अतिवृष्टीचा इशारा, शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

पुणेकरांनो सावधान! अतिवृष्टीचा इशारा, शाळा आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

पुणे शहर तसेच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यात हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी (6 ऑगस्ट) पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत.

  • Share this:

अद्वैत मेहता (प्रतिनिधी)

पुणे, 5 ऑगस्ट- शहर तसेच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.  हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी (6 ऑगस्ट) पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये  बंद राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पाऊस आणि पूरस्थितीमुळे शहरातील 6 पूल वाहतुकीसाठी पाणी ओसरेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, पुणे-बंगळुरू महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार, अशा अफवा पसरवली जात आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

अतिवृष्टीमुळे सोमवारी शाळांना सुट्टी..

पुणे शहर तसेच जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (5 ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्याने गतवर्षीची पाणी पातळी ओलांडली आहे. रविवारी सायंकाळी चारही धरणांत मागील वर्षापेक्षा 3 टीएमसी जादा पाणी जमा झाले आहे. त्यामुळे धरणातून सतत पाण्याचा विसर्ग होत आहे.

Loading...

पुण्यात हाहाकार...100 हून अधिक रहिवाशांना काढलं सुखरूप बाहेर

कालच्या इतका जोर नसला तरी पुण्यात आज श्रावणधारा बरसतच आहेत. सर्व धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. खडकवासला, पवना धरणातून पाणी सोडल्याने मुळा, मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सखल भागात पाणी शिरले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध इमारतींमधून बोटी, ट्यूबच्या मदतीने रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. मुळशी धरणातून सोडलेले पाणीही बाणेर, औंध भागात शिरल्याने औंध मार्टजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. औंध, बाणेर भागात साईदत्त सोसायटी, ज्युपिटर रुग्णालयाजवळची इमारत, वारजे तपोवन भागातील जवळपास 100 हून अधिक रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.

'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...