पुणे: ...तर तुझा भाऊ जीवंत नाही राहणार, शाळकरी विद्यार्थीनीला धमकावून केला बलात्कार

पुणे: ...तर तुझा भाऊ जीवंत नाही राहणार, शाळकरी विद्यार्थीनीला धमकावून केला बलात्कार

तु माझ्याशी बोल. मी जसं सांगतो तसं कर कर नाहीतर तुझ्या भावाला मारून टाकेन अशी धमकी आरोपीकडून करण्यात आली. यामुळे घाबरुन जात पीडित मुलगी आरोपीच्या सांगण्याला बळी पडली.

  • Share this:

पुणे, 23 ऑगस्ट : समाजामध्ये कितीही जनजागृती केली किंवा कितीही कठोर कायदे केले तरी बलात्कार घडण्याचे प्रकार काही केल्या कमी होत नाही आहे. यामध्ये अल्पवयीन आणि शाळकरी मुलींवर बालात्कार होण्याचे प्रकार वाढले आहेत. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये मुलांना मारुन टाकण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना ताजी असताना आता भावाला मारण्याची घमकी देत एका शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुण्यातल्या विमाननगरमधील धानोरीमध्ये एका 14 वर्षांच्या शाळकरी विद्यार्थीनीवर बलात्कार करण्यात आला आहे. तुझ्या भावाला जीवे मारने अशी धमकी देत आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकाराविरोधात विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा पीडित मुलीच्या घराजवळ राहतो. तु माझ्याशी बोल. मी जसं सांगतो तसं कर कर नाहीतर तुझ्या भावाला मारून टाकेन अशी धमकी आरोपीकडून करण्यात आली. यामुळे घाबरुन जात पीडित मुलगी आरोपीच्या सांगण्याला बळी पडली. आरोपीने याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. प्रकरणाची पोलीस तक्रार करण्यात आली असून पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी!

मुलांना मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडला आहे. शरीरसंबंध ठेवण्यासाठी महिलेला अनेक प्रकारे धमकावलं आणि संधी मिळताच तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या प्रकाराची माहिती मिळताच आरोपीला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

इतर बातम्या - जेव्हा दाम्पत्याने PORN साईटवर पाहिला त्यांचाच अश्लील VIDEO आणि नंतर...!

विपुल कासार(३९)असं आरोपीचं नाव आहे. विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेच्या व्हॉट्सअॅपवरील डीपी संग्रहित करून ते सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी आरोपीकडून देण्यात आली. त्यानंतर तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन अशीही आरोपीकडून धमकी देण्यात आली. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवला होता. त्यावर तो सतत तिला फोन करायचा आणि तु मला खूप आवडतेस. तुला वेळ मिळेल तसं तु माझ्याशी बोलत जा आणि मला भेट असं आरोपी पीडित महिलेशी बोलायचा. घाबरलेल्या महिलेने हा सर्व प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पीडित महिलेल्या पतीकडून आरोपी विपुल याला समज देण्यात आली.

इतर बातम्या - मेट्रोमध्ये तरुणीने केलं फोटोशूट, Video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

या सगळ्यानंतर आरोपी काही दिवस शांत राहिला. त्यानंतर त्याने पुन्हा महिलेला संपर्क केला आणि तिचे संग्रहित केलेले व्हॉट्सअॅपवरील डीपी सोशल मीडियावर व्हायरल करू अशी तिला धमकी देण्यात आली. आरोपीने महिलेशी बोलण्यासाठी तिला एक मोबाईल आणि सिमकार्ड दिलं. जर माझ्यासोबत फोनवर बोलली नाही तर तुझ्या दोन्ही मुलांना मारण्याची धकमी आरोपीकडून देण्यात आली. त्य़ानंतर घाबरून महिला आरोपीशी बोलत होती.

पीडित महिलेचा पती बाहेरगावी गेला असता आरोपीने तिच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले. जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. यासगळ्या प्रकाराची माहिती पीडित महिलेच्या पतीला समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि चिखली पोलिसांनी आरोपी विपुल याला अटक केली आहे.

VIDEO: 'मोदी है तो मुमकीन है' या घोषणेवर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान

Published by: Renuka Dhaybar
First published: August 23, 2019, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading