मोठी बातमी, पुण्यात 23 नोव्हेंबरपासून शाळा होणार सुरू, पालिकेनं काढला आदेश

सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं, यासाठी एका बेंचवर एकच विद्यार्थी असावा, असं सांगण्यात आलं आहे.

पुणे पालिका क्षेत्रातील इयत्ता नववी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

  • Share this:
पुणे, 19 नोव्हेंबर : गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा (School) आता सुरू होणार आहे. पुणे महापालिकेनंही (pune municipal corporation) शाळा उघडण्याची पूर्ण तयारी केली आहे. येत्या 23 नोव्हेंबरपासून शाळा उघडण्याबद्दल महापालिकेनं आदेश जारी केले आहे. पुणे महापालिकेनं 23 नोव्हेंबरपासून शाळा उघडण्याची घोषणा केली आहे. पुणे पालिका क्षेत्रातील इयत्ता नववी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर नववी ते 12 वीचे वसतीगृह आणि आश्रम शाळा विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. टेक महिंद्राच्या इंजिनिअर तरुणीची आत्महत्या; सहाव्या माळ्यावरून मारली उडी प्रत्येक शाळेवर शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 'टॉयलेट डे'निमित्त भन्नाट शुभेच्छा देत अमृता यांनी संजय राऊतांना पुन्हा डिवचलं कोरोनाच्या परिस्थितीमुळे पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. पण मिशन बिगेन म्हणत अनलॉकची घोषणा करण्यात आली. अनलॉकच्या टप्पयात सर्व उद्योग धंदे, शॉपिंग मॉल, मंदिर आणि चित्रपटगृह सुरू करण्यात आले आहे. शाळा आणि कॉलेजकधी सुरू होणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे राज्यभरातील शाळा ठिकठिकाणी सुरू होत आहे. याआधीच राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालयातील 50 टक्के क्षमतेसह शिक्षकांना हजर राहण्याची परवानगी दिली होती. पुण्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता दरम्यान, पुण्यात गेले 21 दिवस कोरोनाचा आलेख उतरत गेला होता. तो बुधवारी अचानक पुन्हा चढला. Coronavirus ची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पुणेकरांनी काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिकेने (PMC) केलं आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात रुग्णवाढीचा कमी झालेला आलेख बुधवारपासून पुन्हा चढला आहे. ही Covid च्या नव्या लाटेची नांदी असू शकते. त्यामुळे पुणेकरांनी सावध राहावं, असा इशारा महापालिकेनं दिला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची काँग्रेसची घोषणा, आघाडीत खळबळ पुण्यात बुधवारी (18 नोव्हेंबर) दिवसभरात 384 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या 21 दिवसांतील ही सर्वाधिक वाढ आहे. 29 ऑक्टोबरपासून पुण्यात Corona रुग्णांची दैनंदिन संख्या 380 पेक्षा कमी राहिली आहे. गेल्या काही दिवसात तर दीडशेच्या आत नव्या रुग्णांची नोंद होत होती. पण 18 नोव्हेंबरला पहिल्यांदाच कोरोनाची रुग्णांची संख्या एकदम वाढली. तर पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुण्यात दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत सज्ज असल्याचं सांगितलं.
Published by:sachin Salve
First published: