पुण्यात बलात्कार.. आरोपीच्या घरातच आईला विवस्त्र आढळली मुलगी

पुण्यात बलात्कार.. आरोपीच्या घरातच आईला विवस्त्र आढळली मुलगी

पुण्यातील धानोरी परिसरात एका नराधमाने आठवीतल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 23 ऑगस्ट- पुण्यातील धानोरी परिसरात एका नराधमाने आठवीतल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मी सांगेल तसं केलं नाही तर तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन आरोपीने मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपी धनंजय मारमिल्ले (वय-28) याच्याविरूद्ध बाल लैंगि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्का) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आरोपीच्या घरात आईला विवस्त्र आढळली मुलगी

पीडीत मुलगी आई, वडील आणि भावासोबत धानोरीत राहते. आरोपी बुधवारी पीडितेच्य घरी आला. तेव्हा पीडिता घरात एकटीच होती. आरोपीने तिला धमकी दिली. मी सांगेल तसं केलं नाही तर तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही, असे त्याने मुलीला सांगितले. आरोपी पीडित मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला. नंतर त्याने मुलीवर बलात्कार केला. यादरम्यान मुलीच्या मामाचे निधन झाल्याचा निरोप तिच्या आईला मिळाला. ती मुलीला शाळेत घेण्यासाठी गेली. पण मुलगी शाळेत आली नसल्याचे आईला समजले. त्यामुळे आई मुलीचा शोध घेत असताना मुलगी आरोपीच्या घरात विवस्त्र अवस्थेत रडताना आढळून आली. मुलीने तिच्या आईला आपबिती सांगितली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी धनंजय मारमिल्ले फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

VIDEO: 'चला फोडुया EVM ची हंडी'; EVMविरोधात मनसेकडून पोस्टरबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading